मुंबई : नेहमी नव्या वादावर बोट ठेवणारी बॉलिवूडची अभिनेत्री तापसी पन्नूने पुन्हा एका मुद्द्यांवर बोट ठेवले आहे. चित्रपटात अभिनेत्यांना अधिक मानधन मिळतं शिवाय अनेक वेळा चित्रपटाची ओळख देखील अभिनेत्यांच्या नावाने होते. चित्रपटात अभिनेता आणि अभिनेत्री दोघे समान मेहनत घेतात. तरी देखील नेहमी चित्रपटात अभिनेत्याला जास्त महत्त्व दिलं जात असल्याचा टोला तापसीने लगावला आहे. 'पिंक', 'बेबी' अशा अनेक अव्हानात्मक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या 'बदला' चित्रपटावर तिने बोट ठेवले आहे.
चित्रपटात जास्त सीन तापसीवर चित्रीत करण्यात आले होते. तरी मात्र चित्रपटाचं अधिक क्षेय बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना देण्यात आले. "माझे 'बदला' चित्रपटात बच्चन यांच्यापेक्षा जास्त सीन होते. त्यांच्यापेक्षा जास्त काम मी केलं होतं. ते मुख्य भूमिकेत झळकले होते आणि मी खलनायकाची भूमिका साकारली होती."
कलाविश्वात पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे सांगत ती म्हणते, 'मी जेव्हा एखाद्या मुद्द्यावर बोट ठेवते, तेव्हा लोक माझ्यावर निशाना साधतात कलाविश्व हे पुरूषप्रधान आहे. 'बदला' चित्रपट बच्चन यांच्या नावावर ओळखण्यात आला. शिवाय चित्रपटाचं श्रेय देखील त्यांच्या नावे करण्यात आला.'
याआधी तापसीने मिळणाऱ्या मनधनावर प्रश्न उपस्थित केला होता. नुकताच तिला भाषेमुळे देखील विचारणा करण्यात आली होती. तेव्हा मला तेलुगू आणि तमिळ देखील येत असल्याचे सांगितले. सोशल मीडियावर देखील ती कायम सक्रिय असते.