मुंबई : महाराष्ट्रात एकीकडे सत्तासंघर्ष सुरु असताना शिवसेनेचे नेते आणि महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर हे दिल्लीला जाणार आहेत. पण यामागे कोणतंही राजकारण नाही, तर ते होम मिनिटर या शोच्या शूटसाठी दिल्लीला जाणार आहेत. झी मराठीवरील लोकप्रिय शो असलेल्या होम मिनिटर या शोच्या माध्यमातून आदेश बांदेकर घराघरात पोहोचले. याच माध्य़मातून त्यांनी भाऊजी अशी ओळख मिळवली. आता हा शो राज्याबाहेर देखील पोहोचणार आहे. लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
होम मिनीस्टर हा लोकप्रिय शो गेल्या १३ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रातील महिलांनी या शोमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घेतला आहे. पण आता या शोमध्ये राज्यातीलच नव्हे तर देशातील महिलांना सुद्धा भाग घेता येणार आहे. त्यानंतर हा शो सातासमुद्रापार ही जातो का याबाबत देखील अनेकांमध्ये उत्सूकता आहे.
आदेश भाऊजींच्या सूत्रसंचालनामुळे हा कार्यक्रम लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचला. आता भाऊजी दिल्लीत पैठणींचा खेळ खेळणार आहे.