बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल झाली तनिषा मुखर्जी!

सोशल मीडियावर ट्रोल होण्याचा सध्याचा ट्रेंड आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

Updated: Mar 30, 2018, 08:28 AM IST
बोल्ड फोटोशूटमुळे ट्रोल झाली तनिषा मुखर्जी! title=

मुंबई : सोशल मीडियावर ट्रोल होण्याचा सध्याचा ट्रेंड आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यात सेलिब्रेटींच्या ट्रोल होण्याचे प्रमाण अधिक आहे. कारण या न त्या कारणाने सेलिब्रेटी ट्रोलिंगला बळी पडत असतात. यावेळी आता काजोलची बहिण अभिनेत्री तनीषा मुखर्जी ट्रोल झाली आहे. तनीषाकडे सध्या काही काम नाही. पण काम मिळवण्यासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. त्यापैकी एक म्हणजे फोटोशूट. तर तनीषाने नवे फोटोशूट केले आहे. त्यात ती बरीच बारीक आणि ग्लॅमरसही दिसतेय. मात्र प्रेक्षकांना इंप्रेस करण्यासाठी केलेला हा प्रयत्न चक्क फसला आहे. 

काय मिळाल्या कमेंट्स?

तिचा हा अंदाज प्रेक्षकांना अजिबात भावला नाही आणि ती ट्रोलिंगला बळी पडली. काहींनी स्किनी म्हटले तर काहींनी प्लीज, फीट रहा पण इतकेही स्लीम नको, असे सल्ले तिला दिले. युजर्स यावरच थांबले नाहीत तर एका युजरने हाडांचा सापळा म्हटले तर एकाने टीबी पेशंट. या लूकसाठी तनीषाने पुष्कळ मेहनत घेतली असले पण युजर्सने अशा कमेंट्स करुन सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवले.

 

Just because we killed it in the Gold Series!  @vivanbhathena_official

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji) on

 

Gold series! @vivanbhathena_official @tejus01 @parikshaat

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji) on

 

Gold series!

A post shared by Tanishaa Mukerji (@tanishaamukerji) on

तनीषाचे सिनेमे

बिग बॉसच्या 7 व्या सीजनमध्ये तनीषा दिसली होती. तेव्हा अभिनेता अरमान कोहलीशी तिची जवळील वाढली होती. मात्र बिग बॉसमधून बाहेर पडताना दोघे सहमतीने वेगळे झाले.  तुम मिलो तो सही, अंतर, पॉपकॉन खाओ, टू वन थ्री, बी केअरफुल यांसारख्या सिनेमांमध्ये तनीषाने झळकली होती. त्याचबरोबर मराठी, तामिळ व तेलगू सिनेमातही तिने काम केले आहे. पण म्हणावे तसे यश तिला लाभले नाही.