'बागी २' सिनेमा ४ हजाराहून अधिक स्क्रिन्सवर झळकणार

'बागी २' रिलीजच्याआधी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघेही जोरदार प्रमोशन करत आहेत. टीव्ही शोपासून शहरांमध्ये जाऊनही ते जास्तीत जास्त वेळ देत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार 'बागी २' जगभरात ४१२५ स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे.

Updated: Mar 30, 2018, 07:59 AM IST
 'बागी २' सिनेमा ४ हजाराहून अधिक स्क्रिन्सवर झळकणार  title=

मुंबई : 'बागी २' रिलीजच्याआधी टायगर श्रॉफ आणि दिशा पटानी दोघेही जोरदार प्रमोशन करत आहेत. टीव्ही शोपासून शहरांमध्ये जाऊनही ते जास्तीत जास्त वेळ देत आहेत. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार 'बागी २' जगभरात ४१२५ स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे.

४००० हून जास्त स्क्रिन्सवर रिलीज 

साजिद नाडियाडवालाच्या बॅनरमध्ये बनणारा सिनेमा 'बागी २' लवकरच सिनेमाघरात दाखल होतोय. प्रेक्षकांनाही याची चांगलीच उत्सूकता लागली आहे. हा सिनेमा साधारण ४५ देशांमध्ये रिलीज होणार आहे. भारतात या सिनेमासाठी ३,५०० स्क्रिन्स मिळणार आहेत.

परदेशात या सिनेमाला ६२५ स्क्रिन्स मिळणार आहेत.  दोन्ही मिळून ४१२५ स्क्रीन्सवर हा सिनेमा रिलीज होईल. ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्शनेही आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबद्दल माहिती दिली आहे.

अहमद खानचे दिग्दर्शन 

'बागी २' सिनेमाचे दिग्दर्शन अहमद खान करत आहेत. अॅक्शन्सने भरलेल्या या सिनेमात दिशा पटानी आणि टायगर श्रॉफ मुख्य भुमिकेत दिसणार आहेत. अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला हा सिनेमा ३० मार्चला रिलीज होत आहे.