गर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच!

Tamannaah Bhatia Viral Security Video: सोशल मीडियावर हल्ली सेलिब्रेटींचे व्हिडीओ पाहिल्याशिवाय आपला दिवसच पुर्ण जात नाही. त्यातून पापाराझीही त्यांना पुर्णपणे हैराण करून सोडतात. अशातच आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया पाहून फॅननं जे केलं ते पाहून तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल? 

गायत्री हसबनीस | Updated: Aug 8, 2023, 11:48 AM IST
गर्दीत घुसून तमन्ना भाटियाचा हात धरला; गार्ड्स खवळले, मग अभिनेत्रीनं जे केलं ते पाहाच! title=
August 8, 2023 | Tamannaah Bhatia viral video a fan breaches her security and grabs her hand

Tamannaah Bhatia Viral Security Video: बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चा रंगते ती म्हणजे पापाराझींनी टिपलेल्या अभिनेत्री किंवा अभिनेत्यांच्या Oops Moments नाहीतर कलाकारांच्या आक्रसताळेपणाची. त्यातून कुठे स्पॉट झाल्यानंतर कलाकारांना हमखास भेटतात ते म्हणजे त्यांचे फॅन्स. परंतु मध्येच कुठेतरी त्यांचे फॅन्स त्यांना भेटले तर मात्र मग या कलाकारांची चांगलीच गोची होती. फॅन्स हे कलाकारांना पाहून हे चांगलेच उतावळे होतात. आपल्या आवडत्या सेलिब्रेटीला पाहिल्यानंतर तेही आपल्या एरियात तर मग काय? हे चाहते अगदी गुडघ्याला बाशिंग बांधून उतावळे झालेल्या नवऱ्याप्रमाणे एक्ससाईट होतात. त्यातून सुंदर देखण्या, रूबाबदार अभिनेत्री आपल्या पुढ्यात उभ्या राहिल्या तर तेव्हाही चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचल्याशिवाय राहत नाही. कधी कोण त्यांचा हात पकडतं तर कोण त्यांना मिठीच मारते. सेलिब्रेटींच्या आजूबाजूला असलेले बॉडीगार्डही यावेळी काहीच करू शकत नाहीत. सध्या असाच काहीचा प्रकार हा अभिनेत्री तमन्ना भाटिया सोबत घडला आहे. 

अभिनेत्री तमन्ना भाटिया ही सर्वांचीच आवडती अभिनेत्री आहे. त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रगंलेली असते. यावर्षी आलेल्या Lust Stories 2 मुळे तिची चांगलीच चर्चा होती. यावेळी सलग 17 वर्षे ठेवलेला नो किसिंग पॉलिसीचा नियम मात्र तिनं या चित्रपटातून तोडला होता आणि त्यानिमित्तानं तिची चांगलीच चर्चा ही रंगलेली होती. अभिनेता विजय वर्मासोबत तिचे या फिल्ममध्ये इंटिमेट सीन्स आहेत. त्यातून अभिनेत्री काजोलच्याही किसिंग सीनची यावेळी जोरात चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून खासकरून लस्ट स्टोरीज 2 पासून तिच्या आणि विजय वर्माच्या डेटिंगची चर्चा आहे. ते दोघं सतत एकत्र दिसत आहेत. त्यातून त्यांनाही मध्ये मध्ये आपल्या डेटिंगच्या चर्चांचे पिल्लूही सोडायचा प्रयत्न केला आहे. सध्या तमन्नाचा एक व्हिडीओ चर्चेत आहे ज्यात एक फॅन तिच्या आजूबाजूला असलेल्या अंगरक्षकांनाही धक्का देतो आणि तिचा हात पकडतो. 

हेही वाचा - गिरणी कामगाराचा मुलगा ते 'गिनिज बुका'त नोंद; सच्चा कलाकाराच्या मृत्यूचं गूढ मात्र अजूनही कायम

तमन्ना भाटिया हिंदी आणि दाक्षिणात्त्य अभिनेत्री आहे त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. यावेळी अभिनेत्री तमन्ना भाटिया ही केरळमध्ये एका कार्यक्रमासाठी पोहचली होती. त्यावेळी तिनं सुंदर असा साजशृंगार केला होता. तिनं कांजिवरम पद्धतीची हिरवी साडी परिधान केली होती. त्याला साजेसे असे सुंदर सोन्याचे दागिने परिधान केले होते आणि सोबतच केसांचा आंबाडा करून तिनं मोगऱ्याचा गजरा परिधान केला होता. यावेळी आपला हा कार्यक्रम संपवून ती बाहेर पडली होती. तेवढ्यात तिच्या पुढ्यात एक फॅन येतो आणि तिचा हातच धरतो. आजूबाजूला तिचे अंगरक्षक होते याचेही त्याला भान राहिले नाही. 

पाहा व्हिडीओ - 

तेवढ्यात तो तिच्यासोबत सेल्फीही काढतो. परंतु यावेळी तिचा संयम पाहून नेटकरीही तिचे कौतुक करताना दिसत आहेत. यावेळी अनेकांनी म्हटलं आहे की, इतकी मोठी अभिनेत्री असली तरीसुद्धा ती फारच चांगली आहे. आपल्या चांगुलपणानं तिनं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचबरोबर काही नेटकऱ्यांनी असंही म्हटलं आहे की, अशावेळी सेलिब्रेटींसाठी व्यवस्थित सुरक्षा ठेवली पाहिजे कारण अशाप्रकारे कोणीही येऊ त्यांना त्रास देऊ शकते. अशा फॅन्सना काही भानच नसते.