Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पड्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका आहे. या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकरणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं मालिका सोडली. जेनिफरनं मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. तर हे आता झाले नसून हे बऱ्याच दिवसांपासून सुरु होतं. आता जेनिफरचा एक ऑडिओ व्हायरल झाला आहे. यात जेनिफरनं अनेक गोष्टी मोकळेपणानं सांगिल्या आहेत. या ऑडियोत जेनिफर कोणत्यातरी व्यक्तीशी बोलताना तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी बोलताना दिसली.
या कॉलमध्ये जेनिफर बोलताना दिसते की 'मी 15 वर्षांपासून सुरु असलेल्या घटनेला लिहिल्या. जेव्हा त्यांनी हे वाचलं तेव्हा ते म्हणाले की जेनिफर हे तर लैंगिक शोषणाचा स्पष्ट प्रकार आहे. तुमचे प्रोड्युसर तुम्हाला त्यांच्या रुममध्ये येण्यास सांगतात. 7 मार्च 2019 रोजी आम्ही सिंगापुरमध्ये होतो. त्यांनी विचार केला असेल की मॉडर्न मुलगी आहे, पारसी आहे, येईल. त्याच दिवशी माझ्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यांनी मला 8 मार्च रोजी बोलावलं आणि सांगितलं लग्नाचा वाढदिवस नाही आहे, आता कोणत्याही गोष्टीची चिंता नाही, तर माझ्या रुममध्ये ये. मी घाबरेल आणि पटकन पुढे निघून गेले. त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितले की तुझे ओठ खूप सुंदर आहेत. असं वाटतंय की त्यांना पकडून किस करून घेऊ. हे ऐकल्यानंतर तर मी खूप घाबरले. मी माझ्या दोन सहकाऱ्यांना सांगितले, मी त्यांचं नाव सांगू शकत नाही. त्यांनी ही घटना सांगायची असेल तर ते सांगतिल. एक सह-कलाकार तर त्यांना ओरडला की का म्हणून तिला सतत सतावता.
जेनिफरला भीती होती की निर्माते माझे आधीचे पैसे थांबवून ठेवतील. ती पुढे म्हणाली, मी काय जेठालाल नाही की प्रेक्षकांवर परिमाम होईल. मालिकेला 15 वर्षे दिल्यानंतरही मी माझ्या मुलीला दोन तास देऊ शकत नाही. तर इथे काम करणं व्यर्थ आहे. मी माझ्या नवऱ्याला सांगितले, तर ते म्हणाले की परत ये. मी त्याला सांगितलं की ते माझे साडेतीन महिन्याचे पैसे थांबवतील. त्यांनी सांगितलं की पैसे सोड तू, त्या लोकांना दान केले असे समजं.
हेही वाचा : Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच
जेनिफरला तिच्या पतीनं हिंम्मत दिली आणि तिनं मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर तिनं तिच्या दिग्दर्शकाला याची कल्पना दिली. पण तिथे देखील तिचा अपमान केला आणि शेवटी ती म्हणाली, मी जेव्हा निघायला लागली, तेव्हा एग्जिक्यूटिव प्रोड्यूसर जतिन बजाज यांनी मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. तर ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत जेनिफरनं सांगितलं की तिनं असित मोदी, प्रोजेक्चट हेड सोहेल रमाणी आणि एग्जिक्यूटिव प्रोड्यूसर जतिन बजाज यांच्या विरोधात लैंगिक शोषणाचे आरोप केले आहे.