Bollywood चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?; तुमच्या मनातील प्रश्नाचं हे घ्या उत्तर

What Happens to Bollywood Films Expensive Clothes after shooting: आपल्या सर्वांनाच माहिती आहे की बॉलिवूड चित्रपटांसाठी (Bollywood Clothes) महागडे कपडे हे वापरले जातात. परंतु तुम्हाला हे माहितीये का की या महागड्या कपड्यांचे पुढे होते तरी काय? हे कपडे फेकून दिले जातात की विकले जातात की परत वापरले जातात. या प्रश्नाचे उत्तर या लेखातून तुम्हाला मिळेल परंतु एक खर की कपडे फेकून अजिबातच दिले जात नाही. 

गायत्री हसबनीस | Updated: May 13, 2023, 01:17 PM IST
Bollywood चित्रपटांमध्ये वापरण्यात येणाऱ्या महागड्या कपड्यांचे पुढे काय होते?; तुमच्या मनातील प्रश्नाचं हे घ्या उत्तर title=

Bollywood Films Expensive Clothes: बॉलिवूडमध्ये ज्याप्रकारे कलाकारांचा अभिनय आणि त्यांची भुमिका, चित्रपटाची कथा प्रेक्षकांच्या पसंतीस पडते त्याप्रमाणेच भव्यमोठे सेट्स आणि वेशभूषाही कलाकारांच्या पसंतीस पडतात. वेशभूषेसाठी कलाकारांकडून वेगळी मेहनतही घेतली जाते. त्यावर (Bollywood Clothes) असणारे सुरेख कोरीवकाम, नक्षी आणि रंग, एमब्रोयडरी यांवरही विशेष लक्ष केंद्रित केले जाते. त्यामुळे प्रत्येक कलाकारांच्या सौंदर्यांत एक वेगळीच भर पडते.

या कपड्यांसाठी दीर्घकाळ मेहनत घेतली जाते त्यामुळे या कपड्यांच्या किमतीही अवच्चा सव्वा असतात. सामान्य माणसांना मात्र हे कपडे परवडणारही नाहीत इतके ते महाग असतात त्यामुळे सामान्यांना फक्त हे कपडे पाहून नेत्रसुखच मिळते. परंतु तुम्हाला माहितीये का की या कपड्यांचे पुढे काय होते? (what happens to the clothes after using it for bollywood big budget films)

संजय लीला भन्साळी यांचे चित्रपट हे आजपर्यंत सर्वाधिक महागडे असतात. त्यातून या चित्रपटातील कपड्यांसाठी तर हजारोच काय कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. बिग बजेट फिल्ममध्ये सर्वाधिक वाटा हा कपड्यांवरील खर्चांचाच असतो. त्यामुळे कपड्यांचा तामझाम हा बराच मोठा असतो. यातील दोन जिवंत उदाहरणं म्हणजे 'देवदास' (Devdas) आणि 'बाजीराव मस्तानी' (Bajirao Mastani). समोर आलेल्या माहितीनुसार, 'देवदास' या चित्रपटासाठी वापरण्यात आलेल्या कपड्यांचा लिलाव (Auction) करण्यात आला होता.

हेही वाचा - Dahaad Web Series Review: 29 मुलींचे अपहरण करणाऱ्या शिक्षकाला अंजली भाटी कसा धडा शिकवते?

माधुरीच्या 'देवदास'च्या लेहेंग्याचा (Madhuri Devdas Lehenga) लिलाव 3 कोटी रूपयांना झाला. तसेच सलमानच्या 'मुझसे शादी करोगी' या चित्रपटातील एक ड्रेस हा 45 लाखांना विकला होता. तर 'कजरारे' या गाण्यात ऐश्वर्यानं घातलेला लेहेंगा-चोळी हा एका बॅण्डग्रुपला दिला होता. 

पाहा 'त्या' कपड्यांचे नक्की काय होते? 

समोर आलेल्या माहितीनुसार असं कळतं की, एका चित्रपटासाठी वापरण्यात आलेले कपडे हे दुसऱ्या चित्रपटांसाठीही वापरले जातात. काहीतरी जुगाडही केला जातो. अर्थात हे कपडे लीड एक्टर्सना दिले जात नाहीत तर ते मग छोट्या मोठ्या कलाकारांना दिले जातात. 'बंटी और बबली' या चित्रपटातील 'कजरारे' या गाण्यातील ऐश्वर्याचा लेहेंगा हा 'बॅण्ड बाजा बारात' या चित्रपटातील एक बॅकराऊंड डान्सरला दिला गेला.  कधी कधी प्रोडक्शन हाऊस हे कपडे परतदेखील करतं. टेलिव्हिजन कलाकारांसाठीही असंच केले जाते. 

आत्तापर्यंतचे सर्वाधिक महागडे कपडे कोणते होते? 

  • 2010 साली आलेल्या 'वीर' या चित्रपटात सलमान खानची प्रमुख भुमिका होतीय यावेळी त्याचे 6 कपडे हे 20 लाखांच्या घरात होते. 
  • 'बाजीराव मस्तानी' हा चित्रपट सर्वाधिक गजला होता. त्याचसोबतच या चित्रपटाचे बजेटही सर्वाधिक होते. यावेळी दिपिकानं घातलेले कपडे हे लाखो रूपयांचे होते. तसेत तिनं घातलेले दागिने हे 45 लाखांचे होते. 
  • करीना कपूरच्या 'कम्बख्त इश्क' या चित्रपटासाठीही महागडे कपडे घातले होते. तिच्या एका आऊटफिटची किंमत ही 8 लाख रूपये इतकी होती. 
  • 'देवदास'मध्ये माधुरी दीक्षितनं 30 किलोचा लेहेंगा घातला होता. जो 20 लाख रूपयांचा होता. 
  • 'जोधा अकबर' या चित्रपटात ऐश्वर्याचे कपडे हे 2 लाख रूपयांचे होते.