'Taarak Mehta...' Popatlal च्या आयुष्यात हातात गुलाब घेऊन लवंगी मिरची, थेट Popatlal ला प्रपोज

मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असणाऱ्या पोपटलालच्या आयुष्यात ट्विस्ट  

Updated: Jun 14, 2021, 04:48 PM IST
'Taarak Mehta...' Popatlal च्या आयुष्यात हातात गुलाब घेऊन लवंगी मिरची, थेट Popatlal ला प्रपोज title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेने छोट्यापासून वृद्धांपर्यंत प्रत्येकाला पोट धरून हसण्यास भाग पाडलं आहे. सध्या मालिकेतील चर्चेचे विषय म्हणजे दयाबेन यांची वापसी आणि पोपटलालचं लग्न. मालिकेत लग्नासाठी व्याकुळ असलेल्या पोपटलालच्या आयुष्यात एका मुलीची एन्ट्री झाली आहे. ती मुलगी देखील पोपटलालच्या प्रेमात वेडी झाली आहे. आता पोपटलालचं लग्न लवकरचं होवू शकतं असं सांगण्यात येत आहे. खुद्द मुलीने पोपटलालला प्रपोझ केलं आहे. या प्रपोलझलचे फोटो देखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. 

ही मुलगी मालिकेतील एक भाग आहे. मालिकेत ती संजना नावाच्या मुलीची भूमिका साकरताना दिसणार आहे. गेल्या एपिसोडमध्ये खुद्द पोपटलालने संजना म्हणजेच सोनी पटेलला (Soni Patel) प्रपोझ केलं होतं. 

आता संजना आणि पोपटलालचं लग्न होतं की नाही याची चर्चा रंगत आहे. पण संजना पोपटलाल फसवण्याच्या हेतूने त्याच्या आयुष्यात आली असल्याचं कळत आहे.

सध्या मालिकेत लसीकरणाबाबत होणारा काळाबाजार दाखवण्यात येत आहे. पोपटलाल आणि गुकुळधाम सोसायटीचे लोक हा काळाबाजार उघडकीस आणण्यात व्यस्त आहेत. संजना देखील या टोळीचा एक भाग आहे आणि तिला पोपटलाल आवडत नाही, तर हा संपूर्ण खेळ फक्त पोपटलालला फसवण्यासाठी होणार आहे.