Tarak Mehta... मधील 'हा' कलाकार दुबईमध्ये इंजिनीयर, नाव ऐकून धक्काच बसेल

त्यांनी सुरुवातीच्या काळात मराठी मालिका केल्या

Updated: Mar 12, 2022, 04:46 PM IST
 Tarak Mehta... मधील 'हा' कलाकार दुबईमध्ये इंजिनीयर, नाव ऐकून धक्काच बसेल title=

मुंबई : 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या मालिकेत आत्माराम भिडे यांची भूमिका साकारणारे अभिनेते मंदार चांदवडकर यांनी घराघरात आपली ओळख निर्माण केली आहे.

जवळपास 13 वर्षांपासून ते या शोसोबत जोडलेले आहेत. ही मालिका दररोज लोकांचे मनोरंजन करत आहे. शोमध्ये मंदार यांची माधवी भिडे यांच्यासोबतची जोडी सगळ्यांनाच आवडते.

पण आता मंदार यांच्याबाबतची एक मोठी गोष्ट समोर आली आहे. जी ऐकून अनेकांना धक्का ही बसू शकतो. अभिनेता होण्यापूर्वी मंदार हे दुबईत काम करायचे? 

मंदार यांना सुरुवातीपासूनच अभिनयाची आवड होती. पण ते व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर होते, त्यांनी अनेक वर्षे दुबईस्थित MNC मध्ये देखील काम केलं असल्याचं बोललं जात आहे.

मात्र त्यांची आवड अभिनयातच होती. दुबईतील नोकरी सोडून ते भारतात परतले.

दुबई में इंजीनियर थे 'Tarak Mehta' शो के भिड़े भाई, एक्टर बनने का सपना लेकर आए थे मुंबई...ऐसे मिला था किरदार

भारतात परतल्यानंतर मंदार यांनी पहिल्यांदा रंगभूमीवर काम केलं. त्यांनी सुरुवातीच्या काळात मराठी मालिका केल्या. 2008 मध्ये त्यांना 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली.