मुंबई : अनेक अव्हानात्मक चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अभिनेत्री तापसी पन्नूने बॉलिवूडमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्री फिल्म फेअर पुरस्कार विजेती तापसी सध्या तिच्या 'हसीन दिलरूबा' या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. चित्रपट समिक्षकांनी तापसीच्या या चित्रपटाला चारही बाजूने घेरलं आहे. ऐकीकडे कंगना रानौत आणि रंगोली चंदेल तर दुसरीकडे चित्रपट समिक्षक ज्यांनी 'हसीना दिलरूबा'पेक्षा हॉलिवूड फिल्म 'द टुमॉरो वॉर' ला अधिक प्राधान्य दिले आहे.
चित्रपट समिक्षकांच्या या वक्तव्यानंतर तापसी भडकली आहे. 'हसीन दिलरुबा' चित्रपटाला प्रेक्षक आणि चित्रपट समीक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. याच दरम्यान, एक हॉलिवूड चित्रपट प्रदर्शित झाला, ज्याचं नाव आहे - 'द टुमॉरो वॉर'. प्रेक्षक आणि समिक्षकांनी 'हसीन दिलरुबा'पेक्षा 'द टुमॉरो वॉर' चित्रपट अधिक चांगला असल्याचं सांगितल्यामुळे तापसीचा पारा चाढला आहे. त्यामुळे तापसीने प्रेक्षक आणि समिक्षकांवर निशाणा साधला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून तापसी म्हणाली, 'सर, हॉलिवूड आहे ना, सर्व काही चालतं. दोषांकडे दुर्लक्ष करून ते नेहमीच महत्वाकांक्षी असतात.. आम्ही कितीही चांगलं देण्याचा प्रयत्न केला तरीही ते कायम छोटचं वाटेल. त्यामुळे आम्ही त्यांना अनावश्यक वाटतो.....' 'हसीन दिलरूबा'चित्रपटामुळे तापसी चर्चेत आहे.