एकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास

अजय देवगनने केलेल्या एका कृतीची जारदोर चर्चा होतेय. या कृतीची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: Oct 16, 2024, 11:01 AM IST
एकाच वेळेस अजय देवगणने मागवले 11 हजार वडापाव; थेट गिनीज बुकमध्ये नाव! कारण फारच खास title=

'सिंघम अगेन' च्या टीमने स्विगीच्या मदतीने वडापावची सर्वात मोठी ऑर्डर देण्यात आली. या ऑर्डरची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगीने रॉबिन हुड आर्मीच्या मुलांसाठी तब्बल 11000 वडापावची डिलिव्हरी मागवली होती. रॉबिन हूड आर्मी ही एक एनजीओ आहे जी मुंबईत अनेक ठिकाणी अन्न वाटप करून भुकेविरुद्ध लढा देत आहे. 

अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगी यांनी 11,000 वडा पाव डिलिव्हर केले. विलेपार्ले येथे एअरपोर्ट हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज होते जिथे अजय देवगण, रोहित शेट्टी आणि स्विगीचे सह-संस्थापक फणी किशन यांना ऑर्डर मिळाली आणि एकाच ऑर्डरमध्ये सर्वाधिक वडा पाव देण्याचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड बनवला. वांद्रे, जुहू, अंधेरी पूर्व (चांदिवली आणि चकला), मालाड आणि बोरिवली येथील रॉबिन हूड आर्मी समर्थित शाळांमध्ये वडा पावाचे वाटप करण्यात आले. या विक्रमाबद्दल बोलताना रोहित शेट्टी म्हणाले, “आम्ही या वडापावकरता स्विगीसोबत रेकॉर्ड ब्रेक नोंद केली आहे. या वडापावच्या मदतीने मुलांना आनंद आणि जेवण दिल्याचा आनंद आहे. सिंघमच्या व्यक्तिमत्त्वाप्रमाणे ही नोंद अतिशय विक्रमी आहे."

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये रामायणाची झलक

'सिंघम अगेन'च्या ट्रेलरमध्ये कलाकारांची झलक पाहायला मिळते. यात 'रामायण'चा संदर्भही देण्यात आला आहे. यामध्ये पात्रांना आधुनिक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडण्यात आले आहे. ट्रेलरमध्ये अजय देवगणने पुन्हा बाजीराव सिंघमची भूमिका साकारली आहे. त्यात अर्जुन कपूरचा सामना आहे. चित्रपट "चांगले विरुद्ध वाईट" ही थीम मांडतो.

चित्रपटात करीना कपूर अजयच्या पत्नीच्या भूमिकेत आहे तर रणवीर सिंग आणि अक्षय कुमार सिम्बा आणि सूर्यवंशीच्या भूमिकेत दिसणार आहेत. पोलिसांच्या भूमिकेत एक नवीन नाव आहे दीपिका पदुकोणचे, जिची ओळख "लेडी सिंघम" म्हणून झाली आहे. टायगर श्रॉफ देखील एसीपी सत्य पटनायक म्हणून टीममध्ये सामील झाला आहे. 'सिंघम अगेन' या दिवाळीत बॉक्स ऑफिसवर  कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 3'ला टक्कर देईल. 12 ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर, सिंघम अगेनच्या टीमने नवी दिल्लीतील लवकुश रामलीला येथे प्रचंड गर्दी आणि धूमधडाक्यात रावण दहन केले.