'बिग बॉस 16'मध्ये (Big Boss 16) दिग्दर्शक साजिद खानची (Sajid Khan) एन्ट्री झाल्यापासून खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर पहिल्याच दिवसापासून यूजर्सनी चॅनल आणि 'बिग बॉस 16' मेकर्सला फटकारले. 'मी टू' ( MeToo) चळवळीदरम्यान अनेक अभिनेत्रींनी साजिद खानवर (Sajid Khan) लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले होते. दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) अध्यक्षा स्वाती मालीवाल (swati maliwal) यांनी या प्रकरणी 'बिग बॉस 16'च्या (Big Boss 16) निर्मात्यांवर नाराजी व्यक्त केली. तसेच साजिद खानला शोमधून काढून टाकण्याची मागणी केली आहे. स्वाती मालीवाल (swati maliwal) यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (anurag thakur) यांनादेखील पत्र लिहिले आहे.
शोमधून काढून टाकण्याची मागणी
'मी टू' (MeToo) चळवळीनंतर साजिद खान पहिल्यांदाच 'बिग बॉस 16' मध्ये (Big Boss 16) सार्वजनिकरित्या दिसला. यावेळी त्याने सांगितले होते की, त्याच्याकडे 4 वर्षांपासून कोणतेही काम नाही. यानंतरही साजिद खानबाबत सोशल मीडियावर सातत्याने प्रतिक्रिया येत होत्या. स्वाती मालीवाल (swati maliwal) यांनी ट्विटरवर एक पत्र शेअर करत साजिद खानला (Sajid Khan) शोमधून काढून टाकण्याची मागणी अनुराग ठाकूर यांच्याकडे केली आहे.
'MeToo' चळवळीदरम्यान साजिद खानवर 10 महिलांनी लैंगिक छळाचा आरोप केला होता. या सर्व तक्रारी साजिदची घृणास्पद मानसिकता दर्शवतात. आता अशा व्यक्तीला बिग बॉसमध्ये स्थान देण्यात आले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे. साजिद खानला शोमधून काढून टाकण्यासाठी मी अनुराग ठाकूर यांना पत्र लिहिले आहे.
साजिद खान के ख़िलाफ़ 10 महिलाओं ने #MeToo मूव्मेंट के दौरान यौन शोषण के आरोप लगाए थे। ये सभी कम्प्लेंट साजिद की घिनौनी मानसिकता दिखाती है। अब ऐसे आदमी को Bigg Boss में जगह दी गयी है जो कि पूरी तरह ग़लत है। मैंने @ianuragthakur जी को पत्र लिखा है की साजिद खान को इस शो से हटवाएँ! pic.twitter.com/4ao9elyvkk
— Swati Maliwal (@SwatiJaiHind) October 10, 2022
यापूर्वी जेव्हा साजिद खान 'बिग बॉस'मध्ये आला होता तेव्हा शहनाज गिलने (shehnaaz gill) त्याला पाठिंबा दिला होता. याचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला होता. यानंतर शहनाज गिललाही प्रचंड ट्रोल करण्यात आले. शहनाजनंतर कश्मिरा शाह, शिल्पा शिंदे, पायल रोहतगी यांनी साजिदला पाठिंबा दिला. तर देवोलिना भट्टाचार्य, उर्फी जावेद, सोना मोहपात्रा यांनी साजिदच्या शोमध्ये सहभागी होण्यास विरोध केला.