ज्यांच्यासाठी प्रचार केला ते हरणार हे आधीच माहीत होतं पण... - स्वरा भास्कर

स्वराने प्रचार केलेल्या उमेदवारांचा लोकसभा निवडणुकांमध्ये पराभव झाला.

Updated: May 25, 2019, 12:57 PM IST
ज्यांच्यासाठी प्रचार केला ते हरणार हे आधीच माहीत होतं पण... - स्वरा भास्कर title=

मुंबई : लोकसभा निवडणूक २०१९ चा निकाल जाहीर झाल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा भाजपाचा भरघोस मतांनी विजय झाला आहे. या निवडणुकांमध्ये कलाविश्वातील अनेक कलाकार निवडणूक रिंगणात उतरले होते. बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करने भाजपाच्या विरोधी पक्षांच्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता. स्वरा भास्करने जितक्या उमेदवारांसाठी प्रचार केला होता त्या सर्व उमेदवारांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला.

स्वराने प्रचार केलेल्या सर्व उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर स्वरा भास्करने एक ट्विट केलं आहे. 'मी अशा सर्व उमेदवारांसाठी प्रचार केला आहे ज्यांचा निवडणुकीत पराभव होईल याबाबत मला आधीपासूनच माहित होतं. परंतु हे उमेदवार आपल्या लोकशाही, आपल्या संविधानाच्या मूल्यांचा आदर करतात, देशातील तिरस्काराविरुद्ध ते लढा देतात. आणि काहीही झालं तरी या मूल्यांचं महत्त्व कधीच कमी होणार नाही' असं ट्विट स्वराने केलं आहे.

कन्हैया कुमार - चार लाख मतांनी पराभव

अतिशी मर्लेना - तीन लाख मतांनी हार

दिग्विजय सिंह - दोन लाख मतांनी पराभव
अमरा राम - सात लाख मतांनी पराभव 

राघव चड्डा - ३ लाख मतांनी हार
दिलीप पांड्ये - ५ लाख मतांनी पराभव

लोकसभा निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर स्वरा भास्करला चांगलंच ट्रोल करण्यात करण्यात आलं. भाजपाच्या विजयानंतर स्वराच्या ट्विटरवर यूजर्सने अनेक प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. अनेकदा स्वरा तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे सोशल मीडियावरुन चर्चेत असते. तिच्या विधानांमुळे तिला सोशल मीडियावर ट्रोलही केलं जातं.