नवी दिल्ली : सुपरस्टार अमिताभ बच्चन आणि ज्येष्ठ अभिनेत्री जीनत अमान यांच्या १९७९ साली आलेल्या 'द ग्रेट गॅम्बलर' या चित्रपटातलं 'दो लफ्जो की है' हे गाणं अतिशय प्रसिद्ध झालं होतं. आजही या गाण्याची क्रेझ रसिकांच्या मनात कायम आहे. अमिताभ बच्चन आणि जीनत अमान यांनी एकत्र हे गाणं केलं होतं. या गाण्याची क्रेझ इतकी वाढली होती की, काही तरुणांनी या डान्स स्टेप करत आपले डान्स व्हिडिओही तयार केले होते. आता पुन्हा एकदा या गाण्यावर एका ग्रुपने डान्स व्हिडिओ तयार केला असून तो इंटरनेटवर तुफान व्हायरल होत आहे.
या गाण्यावर काही तरुणींने केलेल्या डान्सला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. सहा तरुणींनी मिळून या गाण्यावर बेली डान्स केला आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये यूट्यूबवर Payals Dance Academy द्वारा हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला. हा व्हिडिओ आतापर्यंत १६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. पायल डान्स ग्रुप अनेकदा त्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करत असतात. परंतु या गाण्यावरील डान्सच्या व्हिडिओची चांगलीच प्रशंसा केली जात आहे.
सध्या सोशल मीडिया एक असं माध्यम आहे ज्यात सर्वच जण जोडले गेले आहेत. सोशल मीडियावर शेअर केलेली कोणतीही गोष्ट अगदी काही वेळातच हजारो, करोडो लोकांपर्यंत पोहचते. या माध्यमातून आज देशातील जनता आपलं टॅलेंट जगासमोर आणत आहे. ज्या लोकांना आपलं टॅलेंट दाखवण्यासाठी कोणतीच संधी मिळत नाही अशा लोकांसाठी आज सोशल मीडिया एक वरदानच ठरतं आहे.