Swara Bhaskar Marriage: अभिनेत्री स्वरा भास्कर (Swara Bhaskar) हिनं आपला प्रियकर समाजवादी पार्टीचा युवा नेता फहाद अहमद (Swara Bhaskar and Fahad Ahmad) याच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्या दोघांच्या तूफान चर्चा सोशल मीडियावर सुरु आहेत. फहाद अहमद नक्की आहे तरी कोण? याकडेही सगळ्यांना उत्सुकता आहे. दरम्यान, आता एक मोठी बातमी समोर आली आहे की स्वरा आणि फहाद हे लवकरच लग्न बंघनात अडकणार आहेत. त्या दोघांनी याचा खुलासा केला आहे. स्वरा आणि फहाद यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत त्या दोघांनी हा खुलासा केला आहे.
स्वरा आणि फहाद अहमदचा हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हुम्पलानं शेअर केला आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला स्वरा आणि फहाद हे पापाराझींना पोज देताना दिसत आहे. दरम्यान, यावेळी सगळे शुभेच्छा देत असताना अचानक फहाद बोलतात की सर, लग्न अजून मार्चमध्ये होणार आहे. त्यावर लगेच स्वरा बोलते 'पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त'. स्वरा आणि फहाद यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर आता सेलिब्रिटी त्यांच्या लग्नाची तारिख काय असेल असा विचार करत आहेत.
हेही वाचा : Swara Bhaskar ने दिलेली लग्नाची Hint; 'त्या' पोस्टचा अर्थ चाहत्यांना आता समजला
साखरपुड्यासाठी स्वराने लाल रंगाची साडी नेसली होती. तर फहादनं पांढऱ्या रंगाचा कुर्ता पायजमा व त्यावर लाल रंगाचं जॅकेट परिधान केलं होतं. स्वरा व फहादला चाहत्यांनी कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. स्वरा व फहादची पहिली भेट डिसेंबर ही 2019 साली एका आंदोलनादरम्यान झाली होती. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली. त्यानंतर भेटीगाठी वाढत गेल्या आणि त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. तीन वर्षांनंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फहाद यांच्याशी रजिस्टर कोर्ट मॅरेज करत स्वराने नवीन आयुष्याची सुरुवात केली आहे.
फहाद अहमद हे समाजवादी पार्टीच्या युवा संघटनेचे महाराष्ट्र आणि मुंबई विभागाचे अध्यक्ष आहेत. फेब्रुवारी 1992 साली फहाद यांचा जन्म झाला असून ते मूळचे उत्तर प्रदेशमधील बरेलीचे आहेत. फहाद हे स्वरापेक्षा वयाने चार वर्षांनी लहान आहेत. त्यांनी अलीगड मुस्लिम यूनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समधून एमफिलपर्यंतचं शिक्षण केलं. याच वेळी त्यांनी सक्रीय राजकारणामध्ये सहभागी होण्यास सुरुवात केली.
'टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स'मध्ये शिकतानाच फहाद अहमद हे विद्यार्थी संघाचे महासचिव म्हणून निवडून आले. त्यानंतर ते 2017 पासून 2018 पर्यंत या पदावर कार्यरत होते. सध्या फहाद अहमद याच संस्थेमधून पीएचडीचा अभ्यास करत आहेत