मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या पहिल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात परराष्ट्र मंत्री पदावर सुषमा स्वराज यांनी अत्यंत मोलाचं योगदान दिलं. त्यांनी त्यांची जबाबदारी अत्यंत चोख रितीने पार पाडली. त्यामुळे त्यांनी अनेक नेते, कार्यकर्ते, सामान्य जनता यांच्या मनात घर केले होते. फार कमी वयात मंत्री होण्याचा बहुमान त्यांनी मिळवला होता. पाकिस्तानात अडकलेल्या भरतीय नागरिक उजमा अहमद यांना सुद्धा मायदेशात पुन्हा परत अणण्यासाठी त्यांचा मोलाचा वाटा आहे.
त्याचप्रमाणे दुसऱ्या देशात अडकलेला अभिनेता करणवीर बोहरा यांची देखील भारतात परतण्यासाठी सुषमा स्वराज यांनी मदत केली. त्याचप्रमाणे सामान्य माणसाच्या पाठीशी सुद्धा त्या खंबीरपणे उभ्या राहत होत्या. विशेष म्हणजे उजमा अहमदचं भारतात परत येणं, पाकिस्तानात तिच्या वाट्याला आलेल्या समस्या, भरतात परतण्यासाठी सुषमा स्वराज यांनी केलेली मदत या सर्व घटनेवर चित्रपट साकारण्यात येणार आहे.
उजमा अहमद यांच्या आयुष्यावर साकारण्यात येणाऱ्या बायोपीकमध्ये सुषमा स्वराज यांची भूमिका श्रद्धा कपूर साकारणार असल्याचे समोर येत आहे. या भूमिकेबद्दल सर्वात आधी तब्बूला विचारण्यात आले होते. परंतू एका मुलाखती दरम्यान तिने या सर्व अफवा फेटाळल्या आहेत. निर्माते धीरज कुमार यांनी चित्रपट साकारण्याचा निर्णय घेतला होता.
भारत देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री आणि भाजपाच्या जेष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांनी मंगळवारी रात्री एम्स रूग्णालयात अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं आणि सारा देश शोकसागरात बुडाला. त्या ६७ वर्षांच्या होत्या.