''सोनचिडिया' फ्लॉप झाल्यामुळे सुशांत-साराचं झालं ब्रेकअप'

दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या एका मित्राने हा धक्कादायक खुलासा केला. 

Updated: Aug 20, 2020, 04:28 PM IST
''सोनचिडिया' फ्लॉप झाल्यामुळे सुशांत-साराचं झालं ब्रेकअप' title=

मुंबई :  अभिनेता सुशांत सिंह राजपूतने १४ जून रोजी  वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील घराणेशाही आणि गटबाजीला नेटकऱ्यांनी चांगलचं धारेवर धरलं. सुशांतची आत्महत्यानसून त्याची हत्या झाली असल्याचं त्याच्या चाहत्यांचं म्हणणं आहे. सध्या सुशांत  आत्महत्या प्रकरणाची तपासणी सीबीआय करत आहे. दरम्यान सोशल मीडियावर सुशांत संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहेत. सुशांतचा मित्र सॅम्युअल हाओकिप यानं सुशांत आणि अभिनेत्री सारा अली खान यांच्या नात्याबद्दल खुलासा केला आहे.

अभिनेत्री सारा अली खानने 'केदारनाथ' चित्रपटाच्या माध्यमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. चित्रपटात तिच्यासोबत सुशांत देखील मुख्य भूमिकेत झळकला. शुटींग दरम्यान त्यांच्यातील मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. अर्थत ते एकमेकांच्या प्रेमात असल्याचा खुलासा सुशांतचा मित्र सॅम्युअलने केला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

We accept the love we think we deserve -Stephen Chbosky

A post shared by Samuel Haokip (@jamlenpao) on

सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत तो म्हणाला, 'मला आठवतंय, सारा - सुशांत एकमेकांच्या प्रेमात होते. दोघांनाही एकमेकांबद्दल तितकाच आदर होता, जो आजकालच्या नात्यांमध्ये क्वचितच पाहायला मिळतो. सारा, सुशांतच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टीचा विचार कारयची.'

परंतु 'सोनचिडिया' चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा  निर्माण झाला. शिवाय त्यांचं ब्रेकअप बॉलिवूड माफीयांच्या दबावामुळे झाला असावा का ? असा प्रश्न देखील सुशांतचा मित्र सॅम्युअलने यावेळी उपस्थित केला.