#MeToo अभिनेत्रीसोबत छेडछाडीच्या आरोपांवर सुशांतचं स्पष्टीकरण

#MeToo कॅम्पेननंतर पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतचं नाव ट्विटवर ट्रेन्ड होत होतं

Updated: Oct 19, 2018, 09:55 AM IST
#MeToo अभिनेत्रीसोबत छेडछाडीच्या आरोपांवर सुशांतचं स्पष्टीकरण  title=

मुंबई : काही दिवसांपूर्वी अभिनेता सुशांत सिंह राजपूतवर 'किझी और मैनी' सिनेमाची सहअभिनेत्री संजना सांघी हिच्यासोबत छेडछाडीचा आरोप झाला होता. MeToo मोहिमेमध्ये लैंगिक अत्याचाराचा आरोप नसला, अभिनेता तरी सुशांत सिंह राजपूतला समाज माध्यमामध्ये चांगलाच झटका बसलाय. 'किझी और मैनी' नावाच्या चित्रपटात सेटवर अभिनेत्री संजना संघीनं ओव्हर फ्रेंडली झाल्याचा आरोप केला होता. या आरोपांवर सुशांतनं आता स्पष्टीकरण दिलंय. 

 

संजना मुकेश छापडा दिग्दर्शित डेब्यु सिनेमात काम करत होती. तिच्या आरोपांमुळे #MeToo कॅम्पेननंतर पुन्हा एकदा सुशांत सिंह राजपूतचं नाव मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटवर ट्रेन्ड होत होतं... त्यानंतर आपल्यावर होत असलेल्या आरोपांना सुशांतनं प्रत्यूत्तर दिलंय. यावेळी, संजनाशी झालेल्या चॅटचे स्क्रिनशॉट सुशांतनं सोशल मीडियावर शेअर केलेत. 

मीटू मोहिमेचा गैरवापर केला जातोय असंही सुशांतसिंह राजपूतनं म्हटलंय. संजनाचे आरोप चुकीचे असल्याचं सांगताना जुलै आणि ऑगस्टमध्ये संजनाशी झालेल्या संवादाचा स्क्रीन शॉट सुशांतनं शेअर केलाय. 

मुकेश छाबडानंही सुशांतवर होणाऱ्या आरोपांचं खंडन केलंय.