मुंबई : नाना पाटेकर आणि तनुश्री दत्ता यांचा वाद विकोपाला गेलेला असताना आता या वादात धार्मिक रंग आलाय. भीम आर्मीनं अभिनेत्री राखी सावंत विरोधात ओशिवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
'तनुश्रीने टक्कल केलं, ती अंमली पदार्थांचे सेवन करायची' अशी विधानं राखीने केली होती. प्रत्यक्षात तनुश्रीनं विपश्यना करताना बौद्ध धर्माच्या रिवाजाचं आचरण सुरू केलं होतं. त्यामुळे राखीच्या विधानांमुळे बौद्ध धर्माचा अपमान झाल्याचा दावा भीम आर्मीनं केलाय.
बौद्ध धर्म अनुसुचित जातींमध्ये येतो. त्यामुळे या धर्माचा अवमान करणे गुन्हा आहे. राखी सावंत विरोधातील आरोप सिद्ध झाले, तर तिला तुरुंगवास होण्याची शक्यता आहे.