सुशांतला आवडला Ex Girlfriend चा लूक, केलं कौतुक

काय कमेंट केली 

सुशांतला आवडला Ex Girlfriend चा लूक, केलं कौतुक  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आपली Ex Girlfriend अंकिता लोखंडेच्या पोस्टवर कमेंट केली आहे. सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. 

बॉलिवूड सिनेमा मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी या सिनेमात अंकिता लोखंडे आपल्याला दिसणार आहे. अंकिताचा हा लूक प्रेक्षकांना अतिशय आवडला आहे.  

आपल्याला माहितच आहे अंकिता आणि सुशांत सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. पण त्यानंतर दोघे वेगळे झाल्याची बातमी आली. 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. 

अंकिता लोखंडे मणिकर्णिका या सिनेमात कंगनासोबत दिसणार आहे. तिच्या या लूकवर सुशांतने कमेंट केली आहे. तो म्हणतो की, अंकिता तुझा हा लूक खूप छान दिसत आहे. मी तुला हा लूक पाहून खूप आनंदी आहे. तुला भरपूर यश आणि आनंद मिळो हिच प्रार्थना.  

तर अंकिताने यावर प्रतिक्रिया देखील दिली आहे. धन्यवाद सुशांत. मी पण तुझ्यासाठी हीच प्रार्थना करते. यावर देखील सुशांतने रिप्लाय दिला आहे. मी फोटो पाहिला आणि मला खरंच तो आवडला. 

मंगळवारी मणिकर्णिका या सिनेमाचा ट्रेलर रिलीज होणार आहे. या सिनेमात लीड रोलमध्ये अभिनेत्री कंगना रानावत असणार आहे. या सिनेमाची अगदी शुटींगपासून खूप चर्चा आहे. 

 

या कमेंटवर सुशांत सिंहलाव विचारण्यात आलं की, हिंदी सिनेमातील करिअरकरता तू अंकिताला शुभेच्छा देणार का? त्यावर सुशांत म्हणाला की, मी जसा खरा आयुष्यात आहे तेच मी वागतो. 

कमेंटद्वारे मी अंकिताला शुभेच्छा दिल्या आहेत. मी त्या लोकांना दाखवण्यासाठी दिल्या नाहीत. मी खरंच तिला शुभेच्छा देऊ इच्छितो. त्यावर अंकिताने देखील प्रतिक्रिया दिली आहे.