दाक्षिणात्य चित्रपटात सनी लियोनी कधी न पाहिलेल्या भूमिकेत

Sunny Leone : सनी लियोनीच्या दाक्षिणात्य चित्रपटातील या लूकची एकच चर्चा... नव्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतुर

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2024, 04:39 PM IST
दाक्षिणात्य चित्रपटात सनी लियोनी कधी न पाहिलेल्या भूमिकेत  title=
(Photo Credit : Social Media)

Sunny Leone : बऱ्याच काळानंतर अभिनेत्री सनी लिओनी आता दाक्षिणात्य चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटातील तिचा 'कोटेशन गँग' या चित्रपटातील फर्स्ट लूक समोर आला आहे. सनीनं दोन पोस्ट शेअर केले आहेत, या आधी सनी कधीच अशा लूकमध्ये दिसलेली नाही. तिच्या लूकची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 

पहिल्या पोस्टरमध्ये सनी स्कर्टवर एक चेकर्ड शर्टमध्ये दिसतेय तर तिच्यासोबत प्रियामणी देखील दिसते. एका धाडसी ग्रामीण माफियाची भूमिका सनी या चित्सारपटात साकारणार आहे. सनी कायम वैविध्यपूर्ण भूमिका करताना दिसते. हिंदी सोबतच तमिळ आणि मल्याळममध्ये देखील तिनं काम केलं आहे आणि म्हणून तिच्या या बहुभाषिक चित्रपटाला इतर चित्रपटांप्रमाणे प्रेक्षकांकडून तिला कायम प्रेम मिळत आलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

सनीनं तिच्या सोशल मीडियावर पोस्टर शेअर केले आहेत. तिनं पोस्टर शेअर करताच चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे. सनीची आजवर प्रत्येक भूमिका चर्चेत राहिली आणि म्हणून सनीचा चाहतावर्ग हा खूप मोठा आहे यात शंका नाही. त्यामुळे ती या चित्रपटात देखील प्रेक्षकांच्या मनात एक वेगळी छाप सोडेल यात काही शंका नाही. सनीच्या प्रत्येक भूमिकेत एक वेगळेपण आहे आणि सनी आता नव्या भूमिकेसाठी सज्ज आहे. 

प्रियामणी आणि जॅकी श्रॉफ व्यतिरिक्त सनी लिओनी प्रसिद्ध अभिनेत्री सारा अर्जुनसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. विवेक कुमार कन्नन दिग्दर्शनात सनी लिओनी एक महत्त्वपूर्ण आणि आकर्षक भूमिका साकारते जी एक अभिनेत्री म्हणून पुन्हा छाप पाडणार आहे. कोटेशन गँग बद्दल पोस्टर शेयर करताना सनी म्हणाली, 'फॅन्सना नकीच ही एक पर्वणी असणार आहे. या चित्रपटात माझी भूमिका नेहमीच्या भूमिकांपेक्षा अगदीच वेगळी आहे आणि त्यासाठी मी देखील उत्सुक आहे.'

या चित्रपटात तिला मारेकरी म्हणून दाखवण्यात आलं आहे जी एका निर्दयी टोळीची प्रमुख सदस्य आहे. ही कॉन्ट्रॅक्ट किलिंगमध्ये माहिर आहे. सनीची ही भूमिका नक्की कशी असणार हे बघण्यासाठी चाहते उत्सुक असून आता सनी कशी भूमिका साकारणार हे बघण उत्कंठावर्धक ठरणार आहे.

'कोटेशन गँग' व्यतिरिक्त सनीनं अनुराग कश्यपच्या 'केनेडी' आहे जो रिलीज होण्याची सगळेच वाट बघत आहे. तिच्याकडे हिमेश रेशमिया आणि प्रभुदेवा यांच्यासोबत एक शीर्षकहीन चित्रपट असून निर्मितीमध्ये एक शीर्षकहीन मल्याळम चित्रपट देखील आहे. 

हेही वाचा : 'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार!

अभिनेत्री सध्या 'Splitsvilla X5' होस्ट करत असून OTT वर 'ग्लॅम फेम' जज करण्यासाठी सनी सज्ज आहे. सनी आता आगामी काळात काय करणार हे बघण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. सनीला या भूमिकेत बघण्यासाठी तिचे चाहते आता हा चित्रपट कधी रिलीज होणार याची वाट बघत आहेत.