मेकअपमागे दडलेली ही अभिनेत्री कोण ?

‘धूम २’, ‘राबता’, ‘फॅन’, ‘पा’, ‘दशावतार’ या चित्रपटातून आपण मेकअपची जादू पाहिली आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 19, 2017, 12:54 PM IST
मेकअपमागे दडलेली ही अभिनेत्री कोण ? title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : ‘धूम २’, ‘राबता’, ‘फॅन’, ‘पा’, ‘दशावतार’ या चित्रपटातून आपण मेकअपची जादू पाहिली आहे. प्रॉस्थेटिक मेकअपमुळे आपल्या आवडीच्या अभिनेत्याही ओळखणे कठीण होते. हा वरचा फोटो कोणाचा आहे तुम्ही ओळखतं का ? तर ही आहे प्रॉस्थेटिक मेकअपमागे दडलेली बॉलिवूडची ‘बेबी डॉल’ सनी लियोनी. 

सनीने प्रॉस्थेटिक मेकअपमधील काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. तिच्या आगामी चित्रपटासाठी सनी प्रॉस्थेटिक मेकअपची मदत घेतेय. हा मेकअप करण्यासाठी साधारण चार ते पाच तास किंवा त्याहूनही अधिक वेळ लागतो. या फोटोंमध्ये सनीला ओळखणंही कठीण असले तरी सनी नक्की कोणत्या चित्रपटासाठी ही सगळी तयारी करते, याची उत्सुकता सगळ्यांच्याच मनात आहे. 

लवकरच सनी आणि अरबाज खानचा ‘तेरा इंतजार’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्याआधी ती ‘बादशाहो’मध्ये इम्रान हाश्मीसोबत थिरकताना दिसली. दरम्यान, संजय दत्तच्या आगामी ‘भूमी’ चित्रपटातही तिचा एक डान्स नंबर आहे.