...त्याच्यासोबतचा‌ फोटो शेअर करताच चाहते सनीला म्हणतात, 'परफेक्ट जोडी'

सोशल मीडियावर सनीच्या चाहत्याची प्रतिक्रिया  

Updated: Jul 16, 2019, 08:27 PM IST
...त्याच्यासोबतचा‌ फोटो शेअर करताच चाहते सनीला म्हणतात, 'परफेक्ट जोडी' title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अभिनेत्री सनी लिओनी हिने स्वता:च्या कौशल्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या हृदयात एक अनोखी जागा निर्माण केली. सनीने स्वत:च्या स्वबळावर आज बॉलिवूडमध्ये वर्चस्व निर्माण केले आहे. इतकच नव्हे तर चाहत्यांसोबचही तिनं सुरेख असं नातं तयार केलं आहे. 

सनी नेहमीच सोशल मीडियीवर सक्रिय असते. ज्या माध्यमातून तिन कायम‌ चाहत्यांनाही‌ आपल्या आयुष्याचा‌ एक घटक केलं आहे. त्यामुळे तिच्या प्रत्येक पोस्टला चाहत्यांचा भरभरुन प्रतिसाद असतो.

नुकताच सनीने तिच्या इन्स्टाग्राम अकांऊटवर एक फोटो शेयर केला आहे. जो पाहता तिच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला पाहून चाहत्यांनीही 'परफेक्ट जोडी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. सनीसोबतची ही‌ व्यक्ती म्हणजे तिचा पती डॅनिअल‌ वेबर.‌ 

सनीने नुकतांच‌ एक फोटोशुट केला होता. ज्यात सनी तिच्या पतीबरोबर दिसत आहे. सनीच्या या फोटोवर अनेक चाहत्याच्या कमेंट आल्या आहे. नेटकरी त्यांना 'क्यूट कपल' म्हणत आहेत. तर कोणी असंच प्रेमाचं‌ साथीदार भेटण्याची  इच्छा व्यक्त करत आहे. या फोटोमध्ये सनी तिच्या पतीबरोबर खुप खुश दिसत आहे. 

सनीने फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर छोट्या पडद्यावर देखील अनेक रिअॅलिटी शोमध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वी 'अर्जुन पटियाला' या चित्रपटातील तिच्यावर चित्रीत करण्यात‌ आलेलं एक गाण प्रदर्शित झालं होतं. 'क्रेजी हबीबी वर्सेज देसी मुंडा' या गाण्यात सनी झळकली होती.