आठवणींमध्ये रमवणारा 'खिचिक'

नात्यांमध्ये गुरफटत गेलेल्या 'खिचिक' चित्रपटाची चर्चा सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे.

Updated: Jul 16, 2019, 06:28 PM IST
आठवणींमध्ये रमवणारा 'खिचिक' title=

मुंबई : नात्यांमध्ये गुरफटत गेलेल्या 'खिचिक' चित्रपटाची चर्चा सध्या चांगलीच रंगताना दिसत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले आहे. लक्ष वेधून घेणारे असे हे पोस्टर आहे. पाठमोरा मुलगा आणि त्याच्या हातात असलेल्या कागदावर वेगवेगळे फोटो असं हे पोस्टर असून नेहमीच्या धाटणीच्या पोस्टरपेक्षा हे पोस्टर वेगळं दिसत असल्यानं 'खिचिक' लक्षवेधी ठरत आहे. 

कांतानंद प्रॉडक्शन्सच्या सचिन अनिल धकाते यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर पराग जांभुळे, अमितकुमार बिडाला चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. प्रीतम एस. के. पाटील यांनी या चित्रपटाचे लेखन दिग्दर्शन केले आहे. नात्यांची अनोखी कथा या चित्रपटात आपल्याला पहायला मिळणार आहे. सचिन दुबाले पाटील हे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. 

चित्रपटाच्या नावातून नीटसं काही कळत नसल्याने चित्रपटाची कथा गुलदस्त्यात आहे. त्यामुळे चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. येत्या २० सप्टेंबरला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

अभिनेता सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, सुदेश बेरी, अनिल धकाते , शिल्पा ठाकरे, अभिनेत्री पॉला मॅकगिलीन, शीतल ढाकणे,  रसिका चव्हाण , यश खोंड आदी कलाकारांचा अभिनय आपल्याला 'खिचिक' चित्रपटाच्या माध्यमातून पहायला मिळणार आहेत. गुरु ठाकूर आणि दत्ता लिखीत गीतांना अभिषेक-दत्ता यांचे संगीत लाभले आहे.