अमेरिकेत साजरा करतेय निशा कौर वेबर २ रा वाढदिवस

सनी लिऑनची लेक निशा आज 2 वर्षांची झाली आहे.

Updated: Oct 11, 2017, 08:17 PM IST
अमेरिकेत साजरा करतेय निशा कौर वेबर २ रा वाढदिवस  title=

अमेरिका : सनी लिऑनची लेक निशा आज 2 वर्षांची झाली आहे.

सनी आणि तिचा पती डॅनिएल यांनी निशाचे बर्थ डे सेलिब्रेशन सातासमुद्रापार अमेरिकेत साजरे केले आहे. 

निशा ही सनी आणि डेनिएलची दत्तक मुलगी आहे. ती २१ महिन्यांची असताना तिला दत्तक घेण्यात आले. निशाला यापूर्वी सुमारे ११ पालकांनी नाकारले होते. निशाचा रंग सावळा असल्याने तिला अनेकांनी नाकरले असावे असा खुलासा चाइल्ड अडॉप्शन रिसोर्स एजन्सीने केला होता. पण असा सनीने तिची निवड करताना अशा गोष्टींकडे फारसे लक्ष दिले नव्हते. 

सनी आणि डॅनिएल तिच्या मुलीच्या आयुष्याबद्दल, करिअर बाबत फोकस्ड आहे. सध्या अमेरिकेत तिघंही वाढदिवस साजरा करत आहेत. त्याचे काही फोटो सोशल मीडियामध्ये झपाट्याने फिरत आहेत.