मुंबई : झी मराठी अवॉर्ड्सवर ठसठशीत मोहोर उमटवतानाच 'लागिरं झालं जी'च्या अजिंक्य आणि शीतलनं आपल्या परफॉर्मन्सनं उपस्थितांना रोमॅन्टिक व्हायला भाग पाडलं.
'झी मराठी अवॉर्ड्सचा सोहळ्यात' सर्वात जास्त म्हणजेच तब्बल १० पुरस्कार पटकावत 'लागिरं झालं जी'ने बाजी मारली. सळसळता उत्साह आणि जल्लोषपूर्ण वातावरणात पार पडलेला हा सोहळा येत्या रविवारी, १५ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वा. झी मराठी आणि झी मराठी एच डी वाहिनीवरुन प्रसारित होणार आहे.
शीतल अजिंक्यच्या ठेक्यावर तुम्हीसुद्धा ताल धराल....!! लागिरं झालं जी असं आपसूकच म्हणायला लावणारा हा Performance नक्की पहा #ZMA2017मध्ये. pic.twitter.com/0y1uodsfYj
— Zee Marathi (@zeemarathi) October 11, 2017
'लागिरं झालं जी' या मालिकेने सर्वोत्कृष्ट शीर्षक गीत, सर्वोत्कृष्ट सहाय्यक स्त्री आणि पुरुष व्यक्तिरेखा, सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा , सर्वोत्कृष्ट बाल कलाकार, सर्वोत्कृष्ट जोडी, सर्वोत्कृष्ट आजी, सर्वोत्कृष्ट वडिल, सर्वोत्कृष्ट नायिका, सर्वोत्कृष्ट जोडी असे पुरस्कार पटकावित या सोहळ्यावर आपली ठसठशीत मोहोर उमटवली.