...आणि म्हणून सनी देओलचा मुलगा अर्धवट शूटींग सोडून परतला !

अभिनेता सानी देओलचा मुलगा 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता.

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Oct 10, 2017, 06:13 PM IST
...आणि म्हणून सनी देओलचा मुलगा अर्धवट शूटींग सोडून परतला ! title=
फोटो सौजन्य: सोशल मीडिया

मुंबई : अभिनेता सानी देओलचा मुलगा 'पल पल दिल के पास' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार होता. फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात देखील झाली. मात्र मनालीमध्ये सुरु असलेलं शूटींग सोडून करण मुंबईत परतल्याचं वृत्त 'द स्पॉटबॉय' या वेबसाईटने दिले आहे.

शूटींग दरम्यान काही साहसदृश्ये करताना करणच्या पायाला दुखापत झाल्याने शूटींग अर्धवट सोडून करणला मुंबईत परतावे लागले. या चित्रपटाची अभिनेत्री साहेर हीने देखील मुख्य अभिनेता करण नसल्याने शूटींगला सुट्टी घेतली आहे. करण बरा होऊन पुन्हा सेटवर आल्यावरच ती शूटिंगसाठी परतणार असल्याचं म्हटलं जातंय. दुखापतीतून बरं होण्यासाठी करणला दहा ते बारा दिवस लागणार असून, डॉक्टरांनी त्याला पूर्णवेळ आराम करण्यास सांगितले आहे.

saher bamba

अभिनेत्री साहेर बांबा. 

'पल पल दिल के पास' हा एक रोमॅण्टिक चित्रपट असून देओल प्रॉडक्शन हाऊस आणि झी स्टुडिओ मिळून याची निर्मिती करत आहे.