'गदर'च्या नावावर आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड, 22 वर्षात शाहरुख, सलमानही देऊ शकले नाहीत मात

Gadar Ek Prem Katha: जे आजपर्यंत शाहरुख, सलमानला जमले नाही ते सनी देओलच्या गदरने करुन दाखवले होते. या चित्रपटाने इतिहास रचला होता. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 26, 2023, 03:51 PM IST
'गदर'च्या नावावर आहे एक वर्ल्ड रेकॉर्ड, 22 वर्षात शाहरुख, सलमानही देऊ शकले नाहीत मात title=
Sunny Deol Amisha Patel Gadar Ek Prem Katha Have World Record

Gadar Ek Prem Katha: सध्या अभिनेता सनी देओलचा 'गदर -2' या सिनेमाचीच चर्चा आहे. 2001मध्ये आलेल्या गदर- एक प्रेम कथाचा सिक्वेल आहे. त्यानंतर तब्बल २२ वर्षांनंतर या सिनेमाचा पार्ट २ येत आहे. त्यामुळं या सिनेमासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. 'गदर 2' 11 ऑगस्ट 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. गदर या चित्रपटाचे संवाद, गाणी आणि कलाकारांचा अभिनय यामुळं त्याकाळी हा चित्रपट प्रचंड गाजला. पण तुम्हाला माहित्येय का अनिल शर्मा दिग्दर्शित गदर या चित्रपटाच्या नावे एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. शाहरुख, सलनामच्या चित्रपटांनाही जे जमले नाही ते सनीच्या 'गदर'ने करुन दाखवले आहे. 

गदरमधील हँडपंपचा सीन तुम्हालाही अजूनही आठवतोय ना. या चित्रपटातील सीनचे अनेक मीम्सदेखील समोर आले होते. भारतातील तरुण आणि पाकिस्तानातील तरुणी यांच्यातील प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास यावर हा चित्रपट आधारित आहे. या चित्रपटाला लोकांनी डोक्यावर उचलून धरले होते. आता याच चित्रपटाचा दुसरा भाग येत आहे. तेच कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. तारा सिंह आणि सकीना यांच्या मुलाला आणण्यासाठी पाकिस्तानात जातात. त्यानंतर घडलेल्या घडामोडींवर हा चित्रपट आधारित आहे. 

सनी देओल आणि आमिषा पटेल यांच्या मुख्य भूमिका असलेला गदर हा चित्रपट आमिर खानच्या लगानसोबत 15 जून 2001मध्ये रिलीज झाला होता. या आधीही सनी आणि आमिरचे चित्रपट एकत्रच प्रदर्शित झाले होते. घायल आणि घातकदेखील दिल आणि राजा हिंदुस्तानीसोबत क्लॅश झाले होते. पण हे चारही चित्रपट सुपर डुपर हिट ठरले होते. तसं, पाहायला गेले तर आमिर आणि सनी दोघंही एकमेकांसाठी लकी चार्म आहेत. 

सनी देओलच्या गदरच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्डदेखील आहे. IMDB रिपोर्टनुसार, हा जगातील असा पहिलाच सिनेमा हा ज्याचे लाख- दोन लाख नव्हे तर 10 कोटी तिकिटांची विक्री झाली होती. हा चित्रपट बॉलिवूडचा ब्लॉकबस्टर आहे. याचा रेकॉर्ड सलमान आणि शाहरुखचा कोणताही चित्रपट मोडू शकला नाहीये. इतंकच नव्हे तर, 18.5 कोटींमध्ये तयार झालेला या चित्रपटांने भारतात 76.88 कोटींचा गल्ला जमावला आहे. तर जगभरात 143 कोटी कमावले आहेत. म्हणजेच एकूण या सिनेमाने तेव्हा 200 कोटींचा आकडा पार केला होता. 

सनी देओलचा गदर 350 स्क्रीनवर प्रदर्शित झाला होता. भारतात 5.05 कोटी लोकांनी हा सिनेमा पाहिला होता.