'वोग' मॅगझिनच्या 'या' कव्हर पेजवरून ट्रोल झाला करण !

वोग मॅगझिनच्या दहाव्या वर्षाच्या एडिशनमध्ये कव्हर पेजवर चित्रपट निर्माता दिग्दर्शन करण जोहर झळकत आहे. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 26, 2017, 08:03 PM IST
'वोग' मॅगझिनच्या 'या' कव्हर पेजवरून ट्रोल झाला करण ! title=

नवी दिल्ली : वोग मॅगझिनच्या दहाव्या वर्षाच्या एडिशनमध्ये कव्हर पेजवर चित्रपट निर्माता दिग्दर्शन करण जोहर झळकत आहे. त्याच्या सोबत बॉलिवूडच्या तीन सुंदर अभिनेत्री देखील आहेत. या सुंदर अभिनेत्री म्हणजे अनुष्का शर्मा, सोनम कपूर आणि ट्विंकल खन्ना. मॅगझिनच्या कव्हरवर फोटोसोबत एक कॅप्शन लिहिलेली दिसत आहे. त्यात असे म्हटले आहे, 'वुमेन ऑफ द ईयर... अँड द मॅन वी लव.' परंतु, सोशल मीडियावर हे कव्हर खास कोणाच्या पसंतीस उतरलेले दिसत नाही. त्यामुळे कारण जोहर आणि या तीन अभिनेत्री सोशल मीडियावर ट्रोल झाल्या. 

सोशल मीडियावर लोकांचे असे म्हणणे होते की, करण जोहरचे कव्हर पेजवर काही काम नाही. म्हणून लोक म्हणतात, 'चार सुंदर महिला.'  

 

बॉलिवूडमधील करण जोहरने अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. करणच्या प्रॉडक्शन हाऊसमधून 'इत्तेफाक', 'ड्राइव' आणि 'राजी' हे तीन चित्रपट प्रदर्शनाच्या वाटेवर आहेत. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x