'स्त्री 2' ने दुसऱ्याच दिवशी मोडला शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांचा रेकॉर्ड!

'स्त्री 2' चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. कमाईच्या बाबतीतही हा चित्रपट आघाडीवर आहे. 'स्त्री 2'ने दुसऱ्याच दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे. कोणते आहेत ते चित्रपट? वाचा सविस्तर

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 17, 2024, 07:13 PM IST
'स्त्री 2' ने दुसऱ्याच दिवशी मोडला शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांचा रेकॉर्ड! title=

Stree 2 : नुकताच 'स्त्री 2' चित्रपट प्रदर्शित झाला आहे. 2024 मधील 'स्त्री 2'हा तिसरा हॉरर चित्रपट आहे. प्रेक्षकांकडून देखील या चित्रपटाला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत आहे. एकीकडे  'स्त्री 2' ला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसत आहे. या चित्रपटाने दुसऱ्या दिवशी कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे. 

हे आहेत शाहरुख खानचे 5 चित्रपट

2023 वर्ष शाहरुख खानसाठी खूप खास ठरले. त्याच्या पठाण आणि जवान या चित्रपटांनी प्रत्येकी 1000 कोटींची कमाई केली होती. हा रेकॉर्ड तोडणे प्रत्येक अभिनेत्यांसाठी मोठे आव्हान बनले आहे. अशा परिस्थितीत 'स्त्री 2' ने दुसऱ्या दिवसाच्या कमाईच्या बाबतीत शाहरुख खानच्या या 5 चित्रपटांना मागे टाकले आहे.  

1. डंकी- शाहरुख खानचा 'डंकी' हा चित्रपट 2023 च्या शेवटी प्रदर्शित झाला. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी बनवला होता. 120 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने जगभरात 454 कोटींचा व्यवसाय केला. पण दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर 'डंकी'ने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 20 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली होती. जी 'स्त्री 2' पेक्षा 10 कोटी रुपये कमी आहे. 

2. जब हैरी मेट सेजल- अभिनेता शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा 2017 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जब हैरी मेट सेजल'कडून निर्मात्यांना खूप अपेक्षा होत्या. पण हा चित्रपट काही विशेष करु शकला नाही. जगभरात या चित्रपटाने 111 कोटींहून अधिक कमाई केली होती. भारतात फक्त 64 कोटी कमावले होते. रिलीजच्या दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने केवळ 15 कोटी रुपये कमावले होते. 

3. चेन्नई एक्सप्रेस- शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांचा सुपरहिट चित्रट 'चेन्नई एक्सप्रेस' 2013 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट 115 कोटींच्या बजेटमध्ये बनवला होता. भारतात या चित्रपटाने 227.13 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आणि जगभरात 422 कोटींहून अधिक कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 28 कोटींची कमाई केली होती. 

4. रईस- 2017 मध्ये अभिनेत्री माहिरा खानसोबत शाहरुख खानचा 'रईस' चित्रपट प्रदर्शित झाला होता. 92 कोटींचे बजेट असलेल्या या चित्रपटाने 138 कोटींहून अधिक कमाई केली होती. जगभरात 281.45 कोटी रुपयांची कमाई केली होती. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 26.30 कोटींची कमाई केली होती. 

5. जब तक है जान- कतरिना कैफ, शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा यांचा 'जब तक है जान' सुपरहिट ठरला होता. या चित्रपटासाठी निर्मात्यांनी 50 कोटी खर्च केले होते. भारतात या चित्रपटाने 120 कोटी रुपयांची कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने 235.70 कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाने रिलीजच्या दुसऱ्या दिवशी 19.50 कोटींची कमाई केली होती.