मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन झाल्याची बातमी समोर आली आणि सर्वांनाच एक धक्का बसला. श्रीदेवी यांच्या मृत्यू संदर्भात आता एक मोठा खुलासा समोर आला आहे.
यूएईमधील वृत्तपत्र खलीज टाईम्सने श्रीदेवी यांच्या आयुष्यात शेवटच्या ३० मिनिटांत नेमकं काय झालं याचं वृत्त दिलं आहे. मृत्युपूर्वी श्रीदेवी यांच्यासोबत काय झालं यासंदर्भात खलीज टाईम्सने वृत्त छापलं आहे.
या वृत्तपत्रात दावा करण्यात आला आहे की, अभिनेत्री श्रीदेवी बाथटबमध्ये बेशुद्धावस्थेत पडली होती. पाहूयात शनिवारी रात्री त्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं?...
अभिनेत्री श्रीदेवी यांना सरप्राईज डिनरला नेण्याचा बोनी कपूर यांचा प्लॅन होता. त्यासाठी बोनी कपूर यांनी तयारी केली होती असंही खलीज टाईम्सने म्हटलं आहे.
खलीज टाईम्सने दिलेल्या वृत्तपत्रात म्हटलं आहे की,
१९६३ मध्ये जन्मलेल्या श्रीदेवी यांनी १९६७ साली एक बाल कलाकार म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली. श्रीदेवीने हिंदीसोबतच तेलुगु, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमांतही काम केलं आहे. श्रीदेवीला २०१३ साली सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले.