कार्डिअॅक अॅरेस्टने नाही तर दुसऱ्या कारणामुळे झाला श्रीदेवींचा मृत्यू

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री अचानक निधन झालं.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 26, 2018, 08:31 AM IST
कार्डिअॅक अॅरेस्टने नाही तर दुसऱ्या कारणामुळे झाला श्रीदेवींचा मृत्यू title=

दुबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री अचानक निधन झालं.

अचानक एक्झिट

श्रीदेवी यांच्या अचानक जाण्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. श्रीदेवी यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे. कोणालाच विश्वास होत नाही आहे की, श्रीदेवी आज आपल्यात नाही आहे.

श्रीदेवी दुबईमध्ये भाचा मोहित मारवाह याच्या विवाहासाठी गेल्या होत्या. श्रीदेवींचं पार्थिव सध्या दुबई पोलिसांच्या ताब्यात आहे. ज्यावेळी श्रीदेवी यांचा मृत्यू झाला तेव्हा त्या हॉटेलच्या रुममध्ये ऐकट्या होत्या. पण आता अशी देखील चर्चा आहे की, श्रीदेवी यांचा मृत्यू कार्डिअॅक अॅरेस्टमुळे नाही तर दुसऱ्या कारणामुळे झाला.

म्हणून झाला मृत्यू?

संजय कपूर यांनी म्हटलं होतं की, श्रीदेवींना हृदयविकाराचा कोणताही त्रास नव्हता. श्रीदेवींवर अनेक कॉस्मेटिक सर्जरी झाली होती. 29 वेळा त्यांच्यावर सर्जरी झाली आहे. एका सर्जरीमध्ये मात्र काही तरी चूक झाली होती. त्यामुळे त्या अनेक औषधं घेत होत्या. साउथ कॅलिफॉर्नियाच्या त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना अनेक डायट पिल्स घेण्याचा देखील सल्ला दिला होता. त्यामुळे त्याचं देखील सेवन त्या करत होत्या.

दुबईमध्ये झालं पोस्टमॉर्टम

श्रीदेवी अनेर अँटी एजिंग औषधं देखील घेत होत्या. यामुळे रक्त गोठतं अशा तक्रारी आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार श्रीदेवी यांचा मृत्यू यामुळे देखील झाला असल्याची शक्यता आहे. दुबईमध्ये त्यांचं पोस्टमॉर्टम झालं पण त्याचा रिपोर्ट अजून समोर आलेला नाही. श्रीदेवी यांचं पार्थिव सोमवारी दुबईहून भारतात आणलं जाईल.