मुंबई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार कमल हसनने 7 नोव्हेंबर रोजी आपला 64 वा वाढदिवस साजरा करतोय. कमल हसनचा 7 नोव्हेंबर 1954 रोजी परमकुडी चेन्नई येथे जन्म झाला. कमल हसन यांनी 1959 मध्ये अवघ्या 6 वर्षांचे असताना बालकलाकार म्हणून सुरूवात केली.
कमल हसन आणि श्रीदेवी यांची केमिस्ट्री स्क्रिनवर खूप लोकप्रिय होती. मात्र कमल हसन श्रीदेवीला आपली बहिण मानत असते. श्रीदेवीच्या निधनानंतर कमल हसन यांनी सांगितलं की, श्रीदेवीला मी 15-16 वर्षांची असल्यापासून ओळखत आहे. आम्हाला दोघांना कपल म्हणून कास्ट केलं होतं. पण खऱ्या आयुष्यात आम्ही बहिण - भावाच्या रुपात मोठे झाले आहोत. आम्हाला रोमँटिक सिनेमांकरता कास्ट केल्यावर आम्ही खूप हसायचो. आम्हाला आम्ही एक फॅमिलीच वाटत असे.
एका मुलाखतीत स्वतः श्रीदेवीने सांगितलं होतं की, ती कमल हसन यांचा सिनेमा पाहण्यासाठी बुर्का घालून जात असे. त्यातही लोकांपासून वाचण्यासाठी ती खूप कमी ठिकाणी जात असे. ती सिनेमांची स्पेशल स्क्रिनिंग पाहत असे.