अनिभिषिक्त श्रीदेवी!

वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 28, 2018, 09:11 PM IST
 अनिभिषिक्त श्रीदेवी! title=

पूनम नार्वेकर,  झी मीडिया, मुंबई  : वयाच्या ५४ व्या वर्षीही मुख्य भूमिका साकारुन चित्रपट एकहाती हिट करण्याची ताकद असलेली दमदार अभिनेत्री म्हणजे श्रीदेवी.... भारतीय चित्रपटसृष्टीत तिशीनंतर नाय़िका मुख्य प्रवाहातून गायब होतात ही आत्तापर्यंतची परंपरा....नायिकांची कारकिर्द तिशीतच संपते ...तिशी ओलांडल्यांनंतर लग्न करुन सेटलल व्हायंच किंवा मग मिळाल्याच तर बहिण नाहीतर मग आईच्या भूमिका करायच्या...पण श्रीदेवीने हा पायंडा मोडला...सशक्त आणि दमदार अभिनयाला वय नसतं हे श्रीदेवीने वयाच्या ५१ व्या वर्षी बॉक्सऑफिसवरही सिद्ध केलं. इंग्लिश विंग्लिश,मॉम, येऊ घातलेला झिरो... नाव न जाहिर झालेले अनेक प्रोजेक्ट श्रीदेवीच्या नावावर होते. ती होती बॉलिवूडची अनभिषिक्त सम्राज्ञी, नव्हे...अनिभिषिक्त श्रीदेवी!

Image result for english vinglish zeenews

५१ व्या वर्षी पुनरागमन... 

वयाच्या ५१ व्या वर्षी  इंग्लिश विंग्लिश सारख्या चित्रपटातून तिने पुनरागमन केलं. घरी लाडू करुन विकण्याचा छोटासा व्यवसाय करणारी सर्वसाधारण गृहिणी...इंग्लिश बोलता न आल्यामुळे नवरा व मुलीकडून मिळणारी अपमानास्पद वागणूक, प्रेमापेक्षाही आदराची अपेक्षा करणारी शशी गोडबोले श्रीदेवीशिवाय कुणी रंगवूच शकली नसती. चित्रपट बॉक्सऑफिसवर हिट ठरला..श्रीदेवीच्या अभिनयाचे कौतुक झालं...हा चित्रपट ऑस्करसाठी परदेशी भाषा विभागासाठी शॉर्टलिस्टही करण्यात आला होता. त्यानंतर २०१६ साली आलेला चित्रपट मॉम...बॉक्सऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं तरी श्रीदेवीचा दमदार अभिनयाची मेजवानी तिच्या चाहत्यांना मिळाली. दोन्ही चित्रपटात नायक आणि नायिका सर्वकाही श्रीदेवी आणि श्रीदेवीच.....

Image result for sridevi zeenews

श्रीदेवी खरंतर ८० च्या दशकातील सुपरस्टार

श्रीदेवी खरंतर ८० च्या दशकातील सुपरस्टार... तेलगू, तामीळ, कन्नड चित्रपटात सत्ता काबीज करुन ती बॉलिवूड जिंकायला आली सज्ज झाली होती. एकहाती चित्रपट हिट करण्याचा ट्रेंड खरंतर श्रीदेवी ने आणला तो सुद्धा जितेंद्र, अमिताभ बच्चन , सनी देओल, विनोद खन्ना, रजनीकांत, कमल हसन असे तगडे अभिनेते समोर असताना.... श्रीदेवी  खरी “हिम्मतवान “ ठरली. विद्या बालन कंगना रणौत, दिपीका पदुकोन यांना एकहाती सिनेमा हिट करताना आपण आत्ता पाहातोय. मात्र श्रीदेवी नावाचं वादळ तेव्हाच घोंगावत होतं..ते अगदी आत्तापर्यंत.हॉलीवूडचा  स्टिवन स्पीलबर्गची ऑफर तिने नाकारली.  ...अमिताभ बच्चन यांच्यानंतर सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती ती श्रीदेवी...पाच वर्षांसाठी तारखा फुल्ल असणारी अभिनेत्री होती ती श्रीदेवी...दिग्गज अभिनेत्यांना भितीपोटी जिच्यासोबत काम करायचं नव्हतं ती अभिनेत्री होती श्रीदेवी...अभिनय, सौंदर्य, नृत्य यांचा मिलाफ म्हणजे श्रीदेवी आणि फक्त श्रीदेवी

Image result for sunny deol sridevi dna

सनी देओलने घेतला कठोर निर्णय 

”ढाई किलो का हाथ किसी पर पडता है न तो आदमी उठता नही उठ जाता है”असा डायलॉग ठोकणा-या सनी देओलने चालबाजनंतर श्रीदेवीसोबत चित्रपट न करण्याचा निर्णय घेतला..श्रीदेवी समोर असल्यावर आम्हाला करण्यासारखे काही राहत नाही अशी खंत सनी देओलने त्याकाळात बोलून दाखवली होती. तर श्रीदेवीसोबत मी काम केलंय अशी शेखी मी माझ्या मुलांसमोर मिरवू शकेन म्हणून मला श्रीदेवीसोबत काम करायचं होतं अशी प्रांजल कबुली शाहरुख खानने दिली होती. चंद्रमुखी या चित्रपटाती रोल सलमानने श्रीदेवीसाठी लिहीला होता.

Image result for bacchan sridevi dna

बच्चन यांची Rival 

८० च्या त्या दशकात अमिताभ बच्चन यांची rival म्हणून श्रीदेवीचा उल्लेख केला गेला.अमिताभ बच्चन सरस की श्रीदेवी? हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात प्रथमच एका हिरोईनची तुलना हिरोसाबत केली जात होती. मिस्टर इंडिया चित्रपटाचा उल्लेख  मिसेस इंडिया केला गेला. हा श्रीदेवीचा प्रभाव होता....बॉलिवूडच्या इतिहासात एक अध्याय रचला गेला होता...त्या अध्यायाचं नाव होतं श्रीदेवी!