श्रीदेवींचे ही 5 गाणी ठरली हिट

बॉलिवूडच्या चांदनीने सगळ्यांनाच आज अलविदा केला. श्रीदेवींचं दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2018, 07:10 PM IST
श्रीदेवींचे ही 5 गाणी ठरली हिट title=

मुंबई : बॉलिवूडच्या चांदनीने सगळ्यांनाच आज अलविदा केला. श्रीदेवींचं दुबईमध्ये कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. सोमवारी सकाळी त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार होणार आहेत.

80 आणि 90 च्या दशकातील श्रीदेवी एक अशा सुपरस्टार होती जी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर देखील भारी होती. श्रीदेवी यांच्या गाण्यांचे अनेक जण फॅन होते. श्रीदेवींचे अनेक गाणे हिट्स ठरले आहेत.

श्रीदेवींचे 5 हिट्स गाणी

1. नेनों में सपना- या सिनेमानेच श्रीदेवी यांनी सुपरस्टार बनवलं. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. पण या सिनेमातील गाणे देखील हिट ठरले होते. श्रीदेवी यांची एक वेगळीच स्टाईल या सिनेमात दिसली होती.

2. मेरे हाथों में- चांदनी सिनेमातील या गाण्यावर अनेक जण थिरकायचे. लग्नांमध्ये हे गाणं वाजायचं. या गाण्यात श्रीदेवीने आपल्या डान्स आणि अक्टींगने अनेकाचं हृदय जिंकलं होतं.

3. काटे नहीं कटते- 90 च्या दशकातील सिनेमा मिस्टर इंडिया सिनेमातील या गाण्याला आयकॉनिक गाणं मानलं जायचं. त्या दशकात श्रीदेवीचा डांस आणि अदा इतर कोणालाही जमेल असं नव्हतं. अनिल कपूरने या सिनेमात त्यांच्यासोबत काम केलं होतं. 

4. मे तेरी दुश्मन- एकमात्र श्रीदेवी अशी अभिनेत्री होत्या ज्यांनी नगीना सारख्या सिनेमात पडद्यावर एक अनोखी जादू केली होती. या सिनेमातील या गाण्यात श्रीदेवीने ज्या प्रकारे डान्स केला ते पाहून अनेकांच्या भूवया उंचावल्या.

5. हवा हवाई- मिस्टर इंडियामधील आणखी एक गाणं हवा हवाईने तर श्रीदेवींना आणखी वर नेलं. हे गाणं इतकं हिट झालं की, श्रीदेवीला लोकांनी मिस हवा हवाई असं नाव दिलं. आज देखील हे गाणं तेवढंच गाजलेलं आहे.