श्रीदेवीचा हा सिनेमा अफगाणिस्तानात सर्वाधिक चालला

 या सिनेमात श्रीदेवीने एका पठाणी मुलीचा रोल केला होता.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Feb 25, 2018, 06:47 PM IST
श्रीदेवीचा हा सिनेमा अफगाणिस्तानात सर्वाधिक चालला title=

मुंबई : श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली. श्रीदेवी अमिताभ बच्चन सोबत खुदा गवाहमध्ये झळकली होती.

'खुदा गवाह'मध्ये डबल रोल

१९९२ खुदा गवाहमध्ये श्रीदेवी अमिताभ बच्चनसोबत डबल रोलमध्ये दिसली, याआधी चालबाज या सिनेमात १९८९ साली श्रीदेवीने डबल रोल केला होता. खुदा गवाह हा चित्रपट अफगाणिस्तानच्या काबूल शहरात १० आठवडे हाऊसफूल चालला असं म्हणतात. या सिनेमात श्रीदेवीने एका पठाणी मुलीचा रोल केला होता.

मिस्टर इंडियाने दिली नवी उंची

मिस्टर इंडियाबद्दल असं म्हणतात, की हा चित्रपट भारतातील पहिला सायन्स फिक्शन सुपरहिरो चित्रपट होता. सलीम-जावेद यांची पटकथा आणि शेखर कपूर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. करिअरच्या सुरूवातीला आपल्या चित्रपटासाठी स्वत: श्रीदेवीने डबिंग केली नव्हती.