'या' अभिनेत्रीसोबत दिग्दर्शक पतीची काम न करण्याची शपथ, नक्की का?

आज राम्या यांचा 52 वा जन्मदिवस आहे. 

Updated: Sep 16, 2022, 05:52 PM IST
'या' अभिनेत्रीसोबत दिग्दर्शक पतीची काम न करण्याची शपथ, नक्की का? title=

Ramya Krishnan Birthday: 'बाहूबली' या सिनेमानं जगभरात आपलं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (Bahubali film) सात वर्षांपुर्वी या सिनेमानं हजारो कोटींची कमाई केली. या चित्रपटातील शिवगामी देवीचा (Shivgami Devi) रोल अनेकांना आवडला. आजही शिवगामी देवी हे पात्र अनेकांच्या पसंतीस उतरते. या पात्राचा रोल निभावणाऱ्या राम्या कृष्णन (Ramya Krishnan) यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. राम्याचा नुकताच लायगर (Liger) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

आज राम्या यांचा 52 वा जन्मदिवस आहे. राम्या यांचा जन्म 15 सप्टेंबर 1970 साली झाला. आज राम्या यांची ओळख साऊथ इंडस्ट्री सर्वात टॉपला आहे. त्याचसोबत त्यांनी बॉलीवूडमध्येही आपल्या वेगळ्या अभिनयाची टाप सोडली आहे. आज बॉलीवूडच काय सगळ्याच तऱ्हेचे कलाकार राम्या यांच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. परंतु एक अशी व्यक्ती आहे ज्यांनी तर त्यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घेतली आहे आणि ही व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांचे पती आहेत. 

राम्या कृष्णन यांचे पती कृष्णा वामसी (Krishna Vamsi) हे दिग्दर्शक आहेत. राम्या यांनी आपल्या पतीच्या एका चित्रपटात काम केले होते त्या चित्रपटादरम्यान असे काही घडले की त्यानंतर राम्या यांचे पती कृष्णा यांनी सरळ त्यांच्यासोबत काम न करण्याची शपथ घातली. एका मुलाखतीत हा संपुर्ण किस्सा राम्या यांनी सांगितला होता. त्या म्हणाल्या, माझी इच्छा असूनही मी माझ्या पतीसोबत चित्रपटात काम करू शकत नाही. मला माझे पती चित्रपटात आता घेणारच नाहीत असे त्यांनी सांगितले.

रम्या कृष्णनने सांगितले होते की, 'आमच्या लग्नानंतर लगेचच मी त्यांच्या 'श्री अंजनेयम' (Shri Ajaneyam) या चित्रपटात काम करत होते. त्यात माझा गेस्ट रोल होता. जेव्हा ते मला डायलॉग्स द्यायचे तेव्हा मी अक्षरक्षः हसायचे. कृष्णा एक गंभीर प्रतीचा दिग्दर्शक आहे. ते काम खूप गंभीर राहून करतात. मी हसले तर त्याला ते अजिबात आवडायचे नाही. मग त्यांची शपथ घेतली की ते मला त्याच्या चित्रपटात कधीच साईन करणार नाही.'

राम्या कृष्णन आणि कृष्णा वामसी यांचे 2003 साली लग्न झाले. साऊथ चित्रपटांव्यतिरिक्त राम्या यांनी बॉलिवूडमध्येही काम केले आहे. राम्याने 1993 मध्ये यश चोप्रा यांच्या 'परंपरा' (Parampara) चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यानंतर त्या अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये (Bade Miya Chhote Miya) दिसल्या होत्या. आता त्या लवकरच रजनीकांतसोबत 'जेलर' (Jailer) चित्रपटातून दिसणार आहेत.