मुंबई : रोहित शेट्टीच्या 'सूर्यवंशी' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अक्षय कुमार आणि कतरिना कैफच्या चित्रपटाने पाच दिवसांत बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा आकडा पार केला आहे. अशाप्रकारे 'सूर्यवंशी' हा 100 कोटींचा टप्पा पार करणारा रोहित शेट्टीचा 9वा चित्रपट ठरला आहे. बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडणारा हा त्याचा सलग नववा चित्रपट आहे. चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी ही माहिती दिली आहे.
#Sooryavanshi is NOT OUT… Continues to attract substantial footfalls even on weekdays, especially in #Maharashtra and #Gujarat… Eyes total in Week 1… Fri 26.29 cr, Sat 23.85 cr, Sun 26.94 cr, Mon 14.51 cr, Tue 11.22 cr. Total: 102.81 cr. #India biz. pic.twitter.com/QtAjvENLLp
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2021
तरण आदर्शने 'सूर्यवंशी'च्या बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल ट्विट केले आहे, 'सूर्यवंशी सिनेमा पाहण्यासाठी आठवड्याच्या दिवसात मोठ्या संख्येने प्रेक्षक येत आहेत. चित्रपटाने शुक्रवारी 26.29 कोटी, शनिवारी 23.85 कोटी, रविवारी 26.94 कोटी, सोमवारी 14.51 कोटी आणि मंगळवारी 11.22 कोटींची कमाई केली. अशा प्रकारे, एकूण पाच दिवसांत चित्रपटाने भारतात 102.81 कोटींची कमाई केली आहे. ,
ROHIT SHETTY: THE HIT MACHINE... #Sooryavanshi is #RohitShetty's NINTH film to cross cr mark... Rohit holds the record for maximum films in cr Club... Indeed, Rohit is making the audience laugh in theatres and his distributors laugh all the way to the bank! pic.twitter.com/dkT52B9r2W
— taran adarsh (@taran_adarsh) November 10, 2021
तरण आदर्शनेही रोहित शेट्टीबद्दल खास माहिती दिली आहे. त्याने लिहिले, 'रोहित शेट्टी हिट मशिन' ठरला आहे. सूर्यवंशी हा रोहित शेट्टीचा सलग 9वा चित्रपट आहे ज्याने 100 कोटींची कमाई केली आहे. अशा प्रकारे 100 कोटींच्या क्लबमध्ये सर्वाधिक चित्रपटांचा विक्रम रोहितच्या नावावर झाला आहे. रोहित शेट्टी त्याच्यामुळे केवळ प्रेक्षकांच्याच नाही तर वितरकांच्याही चेहऱ्यावर हसू आणण्यात यशस्वी झाला आहे.