arjun kapoor सोबतच्या नात्यावर malaika arora च्या मुलाची मोठी प्रतिक्रिया

आपल्या नृत्याने तिने अनेक चित्रपटांमध्ये जीव ओतला. अभिनेत्रीने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले.

Updated: Nov 6, 2021, 08:01 PM IST
arjun kapoor सोबतच्या नात्यावर malaika arora च्या मुलाची मोठी प्रतिक्रिया  title=

मुंबई : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा हिने आपल्या स्टाईल आणि डान्सने हिंदी चित्रपटसृष्टीत एक जबरदस्त ओळख निर्माण केली आहे. आपल्या नृत्याने तिने अनेक चित्रपटांमध्ये जीव ओतला. अभिनेत्रीने 1998 मध्ये अभिनेता अरबाज खानसोबत लग्न केले.

पण अरबाज खान आणि मलायका अरोरा त्यांच्या वैवाहिक जीवनातील चढ-उतारांमुळे 19 वर्षांनंतर एकमेकांपासून वेगळे झाले.अभिनेत्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर मलायका आणि अर्जुन कपूर यांच्यातील जवळीक वाढू लागली. तिचा मुलगा अरहानने मलायका आणि अर्जुनच्या नात्यावर अशी प्रतिक्रिया दिली होती, ज्याची अपेक्षा कोणीही केली नसेल.

एका मुलाखतीत मलायका अरोराने तिच्या आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्दल अरहान खानची प्रतिक्रिया उघड केली. याबद्दल अभिनेत्री म्हणाली होती, "जेव्हा माझा घटस्फोट झाला तेव्हा मला माहित नव्हते की, मी माझ्या आयुष्यात इतर कोणत्याही नात्याला जागा देईन कारण मला माझे हृदय तुटण्याची भीती होती."

याबद्दल बोलताना मलायका अरोरा पुढे म्हणाली, "पण मला प्रेम हवे होते, नाते हवे होते आणि या नवीन नात्याने मला स्वतःला आणखी एक संधी देण्याचा आत्मविश्वास दिला. त्यामुळे मी हे पाऊल उचलले. मला वाटते की प्रामाणिकपणा हा कोणत्याही गोष्टीला सामोरे जाण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे."

मलायका तिच्या आणि अर्जुनच्या नात्याबद्दल अरहानच्या प्रतिक्रियेबद्दल म्हणाली, "तुमच्या आयुष्यात काय चालले आहे हे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना सांगणे महत्वाचे आहे आणि त्यानंतर त्यांनी गोष्टी आणि स्वतःला समजून घेण्यासाठी वेळ दिला पाहिजे." आमच्याकडेही त्या गोष्टी होत्या आणि बाकीचे लोकही खूप आनंदी आहेत याचा मला आनंद आहे.

करीना कपूरच्या शो 'व्हॉट वुमन वॉन्ट्स'मध्ये मलायका अरोराने तिच्या आणि अरबाज खानच्या घटस्फोटावर तिच्या मुलाचे काय म्हणणे आहे हे सांगितले. अभिनेत्री म्हणाली होती, "काळानुसार तो खूप हुशार झाला आणि आनंदी सुद्धा राहू लागला. तो पाहू शकत होता की आम्ही दोघे वेगळे राहून जास्त आनंदी होतो. एके दिवशी तो मला म्हणाला की आई, तुला आनंदी आणि हसतमुख पाहून खूप आनंद झाला."