व्हिडिओ : सोनू निगम पण झाला 'ढिंचॅक पूजा'चा फॅन, गायले 'दिलों का शूटर'

 'सेल्फी सॉन्ग' वाली ''ढिंचॅक पूजा' सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटची मोठी सेंसेशन बनली आहे. लोक तिच्यावर टीका करतात, पण ती चर्चेत आली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jul 11, 2017, 07:00 PM IST
 व्हिडिओ :  सोनू निगम पण झाला 'ढिंचॅक पूजा'चा फॅन, गायले 'दिलों का शूटर'  title=

मुंबई :  'सेल्फी सॉन्ग' वाली ''ढिंचॅक पूजा' सध्या सोशल मीडियावर आणि इंटरनेटची मोठी सेंसेशन बनली आहे. लोक तिच्यावर टीका करतात, पण ती चर्चेत आली आहे. 

'ढिंचॅक पूजा' सोशल मीडियानंतर आता बॉलिवूडमध्ये पोहचली आहे. बॉलीवूडचा सुप्रसिद्ध गायक सोनू निगमच्या तोंडी आता 'ढिंचॅक पूजा'चे गाणे येऊ लागले आहे. 

नुकताच सोनू निगमने एक व्हिडिओ फेसबूकवर पोस्ट केला आहे. यात 'ढिंचॅक पूजा'चे लेटेस्ट गाणे ' दिलों का शूटर' गातांना सोनू निगम दिसत आहे. 

सोनू निगमने सुप्रसिद्ध गायक कुमार सानू यांच्या अंदाजात पूजाचे हे गाणे म्हटले आहे. सोनू निगमचा सुंदर आवाज आणि कुमार सानू यांचा अंदाज यामुळे हे गाणे खूप मजेदार बनले आहे. 

फेसबूकवर शेअर केलेल्या या व्हिडिओला लाखो लोकांनी पाहिले आहे. आणि शेअरही केले आहे.