सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात अर्जून-वरुण-जॅकलिनची धमाल मस्ती...

बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे.

Updated: May 5, 2018, 01:17 PM IST
सोनम कपूरच्या संगीत सोहळ्यात अर्जून-वरुण-जॅकलिनची धमाल मस्ती... title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरचे लग्न काहीच दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे कपूर फॅमेली सध्या या लग्नाच्या लगबगीत आहेत. या दरम्यान अनिल कपूच्या घरी पाहुण्यांची वर्दळ पाहायला मिळते. शुक्रवारी अर्जुन कपूर, वरुण धवन, करण जोहर आणि जॅकलिन फर्नांडिज सोनम कपूरच्या घरी संगीत कार्यक्रमाची तयारी करताना दिसले. या तयारीत त्यांनी खूप धमाल मस्ती केली.

या स्टार्सच्या धमाल मस्तीचे हे व्हिडिओज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडिओत सलमान खानच्या सुपरहिट टायगर जिंदा है सिनेमातील स्वैग से स्वागतवर हे कलाकार थिरकताना दिसले. करण जोहरने हे व्हिडिओज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

 

Regrann from @elfaworld - @arjunkapoor @varundvn practice for @sonamkapoor @anandahuja 's Sangeet! Dancing on @beingsalmankhan 's Swag se karenge sabka Swagat. #sonamkapoor #sonamkishaadi #varun #arjun #arjunkapoor #varundhawan #video #sangeetdance #swagseswagat #rheakapoor #choreography #dancing #wedding #prep #videosofinstagram #varundhawanvideos #varundhawanfan #arjunkapoorvideos #elfaworldelfaworld - #regrann

A post shared by Vaishali Chandra (@vaishali.bhanushali.1) on

तर अर्जुन कपूरनेही या संगीत कार्यक्रमाच्या तयारीचा व्हिडिओ शेअर केला. ज्यात वरुन धवनसोबत तो दिसत आहे. सोनम कपूरचा विवाहसोहळा मुंबईत ८ मे ला होणार असून ७ मे मेंहदी कार्यक्रम आहे. तर शुक्रवारी आनंद आहुजा देखील मुंबईत दाखल झाला.