''तो माणूस मागून आला आणि माझे स्तन...'', Sonam Kapoor 13 व्या वर्षी पडली होती लैंगिक शोषणाची बळी

Sonam Kapoor : बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूरने हिचासोबत ती 13 व्या वर्षी असताना धक्कादायक प्रकार घडला.   

Updated: Jun 11, 2023, 01:25 PM IST
''तो माणूस मागून आला आणि माझे स्तन...'', Sonam Kapoor 13 व्या वर्षी पडली होती लैंगिक शोषणाची बळी title=
sonam kapoor sexually abused in mumbai Gaiety Galaxy theater at age of 13

Sonam Kapoor  Molest : प्रत्येक 10 मुलींमागे 9 मुली या लैंगिक शोषणाच्या शिकार ठरल्या आहेत. बॉलिवूडमधील अभिनेत्री असो स्टार किड यांनाही असे हादरवणारे अनुभव आले आहेत. नुकतीच अभिनेता अनिल कपूरची (Anil Kapoor) मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor)  हिने त्याचा आयुष्यातील सर्वात वेदनादायी अनुभवाबद्दल सांगितलं आहे. जेव्हा तिने या घटनेबद्दल सांगितलं अनेकांच्या चेहऱ्यावरील हवा उडाली. 

''तो माणूस मागून आला आणि...''

राजीव मसंदच्या शोमध्ये अभिनेत्रीने तिच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाबद्दल सांगितले. ती 13 वर्षांची असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक खुलासा खुद्द अभिनेत्रीने केला. अभिनेत्री म्हणाली की, ''प्रत्येकजण बालपणात कधी ना कधी लैंगिक शोषणाला बळी ठरली आहे. माझ्या लहानपणी मी सुद्धा विनयभंगाची शिकार झाली आहे. तो माझ्यासाठी मोठा आघात होता. जवळपास दोन तीन वर्ष मी याबद्दल कोणालाही सांगितलं नव्हतं. आजही मला ती घटना स्पष्ट आठवते.'' (sonam kapoor sexually abused in mumbai Gaiety Galaxy  theater at age of 13)

त्या धक्कादायक घटनेबद्दल सांगता ना ती म्हणाली की, ''ही घटना मुंबईच्या Gaiety Galaxy थिएटरमधील आहे. जेव्हा ती मित्रांसोबत पिक्चर पाहिला गेली होती. पिक्चरच्या मध्यातंरमध्ये सर्व जण खाण्याचे साहित्य घेण्यासाठी बाहेर आलेत. तेव्हा मी देखील बाहेर आली. त्यावेळी एक माणूस मागून आला आणि त्याने माझे स्तन दाबले. तेव्हा मी लहान होती त्यामुळे फिगर वैगेर काही नव्हतं. पण जेव्हा हे माझ्यासोबत घडलं मी हादरली. त्यामुळे मला काही समजलं नाही की हे काय होतं आहे. मी तिथे रडायला लागली.

''पण याबद्दल कोणाशीही काहीच बोलली नाही. त्यानंतर मी परत थिएटरमध्ये जाऊन माझ्या जागेवर बसली आणि पूर्ण पिक्चर पाहिला. कारण तेव्हा वाटतं होतं मीच काहीतरी चूक केली आहे. '' हे ऐकून अभिनेत्री अनुष्का शर्मा, आलिया भट्ट, विद्या बालन आणि राधिका आपटे यांना धक्का बसला. 

सोनमच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती सध्या कुठल्या चित्रपटावर काम करत नाही आहे. ती सध्या लेक वायूसोबत वेळ घालवत आहे. नुकताच सोनमचा वाढदिवस झाला तेव्हा पती आनंदने तिचा (Anand Ahuja Post For Sonam Kapoor) एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला.