लोकप्रिय अभिनेत्री Rubina Dilaik च्या गाडीला अपघात, पती अभिनवनं कारचा फोटो शेअर करत, म्हणाला...

Actress Rubina Dilaik got in Accident: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैक ही नुकतीच एक कार अपघाताचा शिकार झाली आहे. रुबिनानं तिच्या कार अपघातानंतर सोशल मीडियावर तिच्या पतीनं हा सगळा प्रकार सांगितला आहे. त्याआधी कालच आणखी एका अभिनेत्रीचा कार अपघात झाला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 11, 2023, 12:38 PM IST
लोकप्रिय अभिनेत्री Rubina Dilaik च्या गाडीला अपघात, पती अभिनवनं कारचा फोटो शेअर करत, म्हणाला... title=
(Photo Credit : Social Media)

Actress Rubina Dilaik got in Accident: काल छोट्या पडद्यावरील अभिनेत्री स्नेहल रायचा अपघात झाल्याची बातमी समोर आली होती. आता लोकप्रिय अभिनेत्री रुबिना दिलैकचा अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. रुबिनाच्या अपघाताची ही माहिती तिचा पती अभिनव शुक्ला यानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सांगितलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्यानं अशी परिस्थिती कोणासोबतही होऊ शकते असे सांगितले आहे. इतकंच काय तर अपघात झाल्याचे सांगत फोटो देखील शेअर केले आहेत. 

रुबिना दिलैकचा पती अभिनवनं त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनवनं अपघात झालेल्या गाडीचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करत तो म्हणाला, 'हे आमच्यासोबत घडले, तुमच्यासोबतही घडू शकते. ट्रॅफिक लाइट जंप करणाऱ्या मूर्खांपासून सावध रहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तो हसत उभा होता. अधिक माहिती नंतर देईन. रुबिना कारमध्येच होती, पण आता ती बरी आहे, तिला डॉक्टरांकडे घेऊन जात आहे. मुंबई पोलीस तुम्हाला याबाबत कठोर कारवाई करण्याची विनंती रुबीना दिलैक.

अभिनवने कारचे काही फोटो देखील शेअर केले आहेत. मुंबई पोलिसांनी या ट्वीटवर उत्तर देत सांगितलं की "ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणच्या जवळच्या पोलिस स्टेशनला ही माहिती द्या."  

हेही वाचा : पॉर्नस्टार Mia Khalifa दिसणार Bigg Boss OTT 2 मध्ये? पडद्यामागील घडामोडींना वेग

दरम्यान, याआधी स्नेहलचा अपघात झाला होता. त्याविषयी स्नेहलनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत या विषयी सांगितले. “मला अजून हे कळत नाही आहे की नक्की माझ्यासोबत काय झालं. अचानक एक ट्रक आला आणि माझ्या कारला धडकला. माझ्या ड्रायव्हरचे आभार की त्याने माझा जीव वाचवला. आम्ही पोलिसांना कॉल केला आणि 5 ते 10 मिनिटांत तिथे पोहोचले. बोरघाट पोलीस स्टेशनमधील योगेश भोसले यांनी खूप मदत केली. अपघातानंतर मी खूप घाबरले होते, त्यांनी मला ग्लुकोज दिले आणि आवश्यक ती मदत केली. पोलिस वेळेवर येत नाहीत असे लोक का म्हणतात ते मला कळत नाही. आजच्या काळात, ते घटनास्थळी येतात आणि आवश्यक ते सर्व करतात. स्नेहल पुढ म्हणाली, ट्रक ड्रायव्हर पळून गेल्याने आणि त्याच्या वाहनाबद्दल कोणतीही माहिती नसल्याने तिला एफआयआर नोंदवता आला नाही. घटनेनंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले आणि तिच्यावर उपचार करण्यात आले.