वाढदिवसानिमित्त Sonam Kapoor ची अतिउच्चभ्रु पाहुण्यांना मेजवानी; पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी...

Sonam Kapoor Birthday: सोनम कपूरनं आपला 38 वा वाढदिवस साजरा केला आहे. यावेळी तिनं लंडनमध्ये आपला हा वाढदिवस साजरा केला. आपल्या बर्थडे सेलिब्रेशनचे फोटो सध्या तिनं सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. 

गायत्री हसबनीस | Updated: Jun 11, 2023, 02:56 PM IST
वाढदिवसानिमित्त Sonam Kapoor ची अतिउच्चभ्रु पाहुण्यांना मेजवानी; पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी...  title=
(Photo :Sonam Kapoor | Instagram)

Sonam Kapoor Birthday: सोनम कपूर ही कायमच चर्चेत असते. त्यामुळे सोशल मीडियावर सोनम कपूर ही चांगलीच ट्रेडिंग असते. 9 जून रोजी म्हणजेच काल सोनमनं आपला 38 वा वाढदिवस सेलिब्रेट केला. आपला नवरा आनंद अहूजा आणि लेक वायू अहूजासोबत तिनं आपला खास क्षणही एन्जॉय केला. सध्या तिच्या बर्थडेचे फोटो हे सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. त्यामुळे तिचे हे फोटो चांगलेच चर्चेत आहेत. अशावेळी तिनं लंडनमध्ये आपल्या अतिउच्चभ्रु पाहुण्यांना हायफाय मेजवानी दिली. सोनमनं स्वत:हून आपल्या इन्टाग्रामवर पोस्टवरून आपल्या बर्थडे पार्टाचे फोटो शेअर केले आहेत त्यामुळे तिच्या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. या फोटोतून दिसत होतं की यावेळी सोनमच्या बर्थडेसाठी रेड कॉश्चुमची थीम होती. 

सगळेच तिच्या पार्टीसाठी नटून थटून आले होते. त्यावेळी तिनं आपल्या या मित्रमैत्रीणींना हायफाय पार्टी दिली. यावेळी या पार्टीत तिनं महागड्या डिशेसही सर्व्ह केल्या होत्या. आपल्या बर्थडे केकचा फोटोही तिनं यावेळी शेअर केला आहे. सोनमनं आपल्या बर्थडेला लाल रंगाचा ड्रेस घातला होता. यावेळी ती आपल्या या आगळ्यावेगळ्या आऊटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यावेळी तिनं आपल्या लेकासोबतही पोझ दिली. समोर आलेल्या फोटोंनुसार कळते आहे की तिनं आपल्या मित्रमैत्रीणींना आणि परिवाराला फारच महागडी पार्टी दिली आहे. 

हेही वाचा - शुटिंगवेळी ओढवला अतिप्रसंग! कशीबशी वाचली अभिनेत्री, घटनेनंतर अभिनयक्षेत्राला ठोकला रामराम

सध्या सोनम कपूर आपल्या फॅमिलीसोबत एन्जॉय करताना दिसते. ती आपल्या लेकासाठी, वायूसाठी सध्या अधिक वेळ घालवताना दिसते आहे. आपल्या लेकाचा चेहरा तिनं अद्याप दाखवलेला नाही. परंतु तिनं आपल्या लेकाचे फोटो अनेकदा शेअर केले आहेत. मागच्यवर्षी ऑगस्टमध्ये सोनमनं आपल्या लाडक्या लेकाला जन्म दिला. त्यामुळे तिच्या चाहत्यांमध्ये कोण आनंदाचे वातावरण पसरले. वायू आता लवकरच एक वर्षांचा होईल. मागच्यावर्षी सोनमनं आपला वाढदिवस सेलिब्रेट केला तेव्हा वायु तिच्या पोटात होता. आता म्हणता म्हणता वर्ष झालं आहे आणि वायूही मोठा होता आहे. तिच्या वायूसोबतच्या फोटोंनाही प्रेक्षक पसंती दर्शवताना दिसतात. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनम कपूर ही सध्याची लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिचा 'ब्लाइंड' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे. सोनम आपल्या बहीणीसोबत 'रिझन' नावाचा ब्रॅण्ड चालवते. सध्या तिच्या बर्थडे बॅशचे फोटो सगळीकडेच व्हायरल होताना दिसत आहेत.