शुटिंगवेळी ओढवला अतिप्रसंग! कशीबशी वाचली अभिनेत्री, घटनेनंतर अभिनयक्षेत्राला ठोकला रामराम

Archana Joglekar: 90 च्या दशकात एका लोकप्रिय अभिनेत्रीला कठीण प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. परंतु त्यातून ही अभिनेत्री बाहेर आली आणि तिनं आपल्या करिअरला नवी दिशा मिळवून दिली होती, नेमकं काय घडलं होत? 

Updated: Jun 11, 2023, 02:03 PM IST
शुटिंगवेळी ओढवला अतिप्रसंग! कशीबशी वाचली अभिनेत्री, घटनेनंतर अभिनयक्षेत्राला ठोकला रामराम  title=
फाईल फोटो

Archana Joglekar: 90 च्या दशकात हिंदी चित्रपटांप्रमाणे मराठी चित्रपटांचीही कोण क्रेझ होती. त्याकाळी आलेल्या मराठमोळ्या नायिकांनी आपल्या अभिनयानं आणि आपल्या सौंदर्यानं सर्वांचीच मनं जिंकून घेतली होती. आजही त्या काळातील चित्रपट हे प्रेक्षकांना आठवतात. त्या गोल्डन एरातील अशीच एक लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती जिच्या सौंदर्यांनं आणि नृत्यानं तिनं चाहत्यांची मनं जिंकून घेतली होती. परंतु त्यानंतर ही अभिनेत्री मात्र अभिनयक्षेत्रापासून दूर राहिली आता ती अमेरिकेमध्ये स्थिरावली आहे. परंतु त्या काळात एका शुटिंग दरम्यान अभिनेत्रीवर एका चाहत्यांनं बलात्कार करण्याचा लाजिरवाणा प्रयत्न केला होता. परंतु ही अभिनेत्री त्याविरूद्ध लढली. तिनं अभिनयक्षेत्र सोडलं असलं तरीसुद्धा ती आपली नृत्यकला जोपासताना दिसते आहे.

या अभिनेत्रीचे नावं आहे अर्चना जोगळेकर. सध्या अर्चना या अमेरिकेतील न्यू जर्सी येथे राहतात आणि तिथे त्या आपले डान्स क्लासेस घेत आहेत. 90 च्या काळात त्यांनी अनेक लोकप्रिय चित्रपटांतून कामं केली आहेत. त्यातील लोकप्रिय चित्रपट म्हणजे 'एका पेक्षा एक'. या चित्रपटात लक्ष्मीकांत बेर्डे, अशोक सराफ, सचिन पिळगावकर यांच्या हटके भुमिका होत्या. त्यांचा हा चित्रपट त्याकाळी तूफान गाजला होता. या चित्रपटात अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांनी ऐकू येत नसतं तर सचिन पिळगावकर यांना काहीच दिसत नसतं. या विनोदी चित्रपटात अर्चना जोगळेकर यांचीही महत्त्वाची भुमिका होती. त्यासोबतच त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवली होती. 

अभिनेते रवींद्र मंकणी यांच्यासह त्यांनी 'निवडुंग' या चित्रपटातून महत्त्वाची भुमिका केली होती. चित्रपटांसोबतच त्यांनी मालिकांमधूनही कामं केली होती. 'किस्सा शांती का', 'कर्णभूमी', 'फूलवती' यांच्यासारख्या काही लोकप्रिय मालिकांतूनही त्यांनी अभिनय केला आहे. त्यांनी मराठीसोबतच अन्य भाषिक चित्रपटांमधूनही कामं केली आहेत. सगळं काही सुरूळीत असताना मात्र त्यांच्या आयुष्यात एक भयावह प्रसंग घडला. त्या दुर्दैवी प्रसंगानंतर त्यांनी अभिनयापासून ब्रेक घेतला. 

हेही वाचा - शाहरूख खानचे चाहत्यांनी केला वर्ल्ड रेकॉर्ड; 'त्या' 300 जणांनी असं काय केलं?

ही घटना आहे 1997 सालातली. एका उडिया चित्रपटाच्या शुटिंगसाठी त्या गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्यावर परिस्थितीचा फायदा घेत एका चाहत्यानं बलात्कार करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी स्वत:ला यातून कसंबसं बाहेर काढलं परंतु याचा त्यांच्यावर परिणामही झाला. परंतु त्यातून बाहेर येत आता त्या आयुष्यात पुढेही गेल्या आहेत. त्या चित्रपटांतून दिसत नसल्या तरीसुद्धा त्यांनी आपली नृत्यकला जोपासली आहे. समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, या व्यक्तीला पोलिसांनीही ताब्यात घेतलं व अठरा महिन्यांची शिक्षा झाली.