मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक कपल आहेत जे चाहत्यांना कायम कपल गोल्स देत असतात. त्यामधील एक म्हणजे अभिनेत्री सोनम कपूर आणि उद्योगपती आनंद आहूजा... अनेक वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न केलं. त्यांच्या लग्नाची चर्चा देखील तुफान रंगली होती. हे कपल सेशल मीडियावर ऍक्टिव्ह असतं. सोनम कायम पती आनंदसोबत फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. सोशल मीडियावर काहींना त्याचे फोटो आवडतात तर काही युझर्स मात्र त्यांना ट्रोल करतात. सध्या व्हायरल होत असलेल्या फोटोमुळे दोघे ट्रोल होत आहेत.
दोघांना नुकताचं मुंबईत स्पॉट करण्यात आलं. यावेळी सोनमने काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे. तर आनंदने पांढऱ्या रंगाचा शर्ट आणि डेनिम्स घातलं आहे. हा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये सोनम आणि आनंदच्या उंचीत असलेल्या फरकामुळे त्यांना ट्रोल केलं जात.
फोटो पाहून ट्रोलर्स म्हणाले सोनमने हाय हिल्स घातले आहेत आणि आनंदला उंचीमुळे कॉम्ल्पेक्स वाटत आहे. सांगायचं झालं तर सोनम कायम तिच्या फॉशन सेन्समुळे ओळखली जाते. पण तिच्या फॉशनसेन्समुळे तिला कायम ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. पण सोनम सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोलर्सना सडेतोड उत्तर देखील देते.