Sonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral

दोघांचा खास  व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल   

Updated: Oct 12, 2022, 03:59 PM IST
Sonakshi Sinha ला भेटला 'चुलबूल पांडे'?, खास व्यक्तीसोबत अभिनेत्रीचा Video Viral  title=

मुंबई : 'थप्पड से डर नही लगता सहाब... प्यार से लगता है...' या एका डायलॉगने अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने (Sonakshi Sinha) बॉलिवूडमध्ये एन्ट्री (Sonakshi Sinha bollywood entry) केली. त्यानंतर तिने कधी मागे वळून पाहिलं नाही. आता सोनाक्षी प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी आहे. सोशल मीडियावर देखील तिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. सध्या सोनाक्षीचा एक व्हिडीओ तुफान चर्चेत आला आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्रीसोबत जहीर इकबाल (Zaheer Iqbal) देखील दिसत आहे. 

महत्त्वाचं म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून सोनाक्षी आणि जहीर  एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण सोनाक्षीने यावर अद्यापही मौन बाळगलं आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री आगामी सिनेमामुळे प्रचंड चर्चेत आहे. (zaheer iqbal and salman khan relation)

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सोनाक्षी सिन्हा सध्या तिच्या आगामी 'डबल एक्सएल' सिनेमामुळे चर्चेत आहे. अभिनेत्रीचा आगामी सिनेमा 4 नोव्हेंबरला रुपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी सोनाक्षी त्याचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. (zaheer iqbal wife)

गेल्या बऱ्याच काळापासून सोनाक्षी आणि जहीरला एकत्र पाहिलं गेलं होतं. त्यावरूनच त्यांच्या नात्याविषयीचे विविध तर्कही लावले गेले. कलाजगतात सक्रिय असतानाही सोनाक्षीची ही नवी इनिंग बरीच चर्चेत आली आहे. (sonakshi sinha marriage)