Smriti Irani Birthday Special : केंद्रीय मंत्री आणि माजी अभिनेत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांचा आज 23 मार्च रोजी 47 वा वाढदिवस आहे. स्मृती इराणी यांनी अभिनय क्षेत्रातून पदार्पण केलं. स्मृती इराणी यांना 'क्योंकि सास भी कभी बहू थी' या मालिकेतील तुलसी या भूमिकेनं त्यांना लोकप्रियता मिळाली. घरा-घरात त्यांना 'तुलसी' या नावानं ओळखू लागले. स्मृती यांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातील अनेक गोष्टींचा सामना केला होता. त्यांच्या वडिलांची कुरिअर कंपनी होती. पण कुटुंबाची आर्थिक परिस्थिती काही ठीक नसल्यानं. अशा परिस्थितीत त्यांनी कसं तरी शिक्षण पूर्ण केलं आणि नंतर त्या मॅकडोनाल्डमध्ये काम वेटरचं काम करु लागल्या. स्मृती इराणी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
स्मृती इराणी यांचा हा व्हिडीओ 1998 च्या मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये सहभागी झाल्या होत्या. सोशल मीडियावर सध्या त्यांचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत स्मृती इराणी मिस इंडिया झाल्या नाहीत, पण त्यांनी सगळ्यांचे मने जिंकली. आता तुम्हाला सगळ्यांना प्रश्न पडला असेल की स्मृती इराणी या मिस इंडिया ब्यूटी पेजेंटमध्ये कशा पोहोचल्या? ( Smriti Irani ramp walk Video)
मॅकडोनाल्डमध्ये काम करण्यासोबतत स्मृती इराणी या काही ब्यूटी प्रोडक्ट्सची मार्केटिंग देखील करायच्या. त्याचं कारण म्हणजे त्यांच्या घराची परिस्थिती आणि घर खर्च काढण्यासाठी स्मृती इराणी हे काम करायच्या. त्यावेळी एका व्यक्तीनं त्यांना सल्ला दिला की मुंबईत जाऊन ग्लॅमरच्या जगात त्यांनी स्वत: चं नशिब आजमावलं. त्यानंतर एका मित्रानं त्यांना मिस इंडिया कॉन्टेस्टविषयी सांगितले. त्यासाठी स्मृती इराणी यांनी ऑडिशन दिलं. त्यांचं सिलेक्शन झालं पण त्यांचे वडील त्यासाठी तयार नव्हते. त्यांच्या वडिलांनी नकार दिला होता.
स्मृति इराणी यांना त्यांच्या आईनं मदत केली. त्यांच्या आईनं कसेबसे पैसे जमा केले आणि त्यांना मिस इंडियासाठी जाण्यास सांगितले. मिस इंडिया स्पर्धेत स्मृति इराणी या विजेत्या ठरल्या नाही मात्र, त्या फायनलिस्ट झाल्या होत्या. स्मृती इराणी या टॉप 8 मध्ये होत्या.