धाराशिवच्या मुलींना द.कोरियाचा नाद; तीन विद्यार्थिनींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, घटनाक्रम हादरवणारा

Dharashiv Crime News: धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तीन शाळकरी मुलींच्या अपहरणाचा बनाव उघड झाला आहे. उमरगा तालुक्यातील निळूनगर तांडा येथे अगदी चित्रपटाला शोभेल अशी घटना समोर आली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Dec 30, 2024, 07:20 AM IST
धाराशिवच्या मुलींना द.कोरियाचा नाद; तीन विद्यार्थिनींनी रचला स्वतःच्याच अपहरणाचा बनाव, घटनाक्रम हादरवणारा title=
Dharashiv 3 Schoolgirls Who Fled Home To Meet BTS In South Korea

Dharashiv Crime News: तरुणाईवर सोशल मीडियाचा प्रभाव असल्याचे वारंवार दिसून येते.  कोरियातील Bts-V या सिंगर आणि डांसर ग्रुपला भेटण्यासाठी तीन अल्पवयीन मुलींनी स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील उमरगा तालुक्यातील निळूनगर तांडा येथे अगदी चित्रपटाला शोभेल असा प्रकार समोर आला आहे. 

तरुणाई सध्या वेबसिरीज आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध गोष्टींचा प्रभाव पडत असतो. सध्या तरुणाईला मोठ्या प्रमाणात के-ड्रामा व BTS चे वेड लागले आहे. याच वेडापायी तीन तरुणींनी चक्क स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला आहे. कोरियातील Bts-V या सिंगर आणि डांसर ग्रुपला भेटण्यासाठी तीन आल्पवयीन मुलींनी स्व:ताच्याच अपहरणाचा बनाव केला. 

उमरग्याच्या निळू नगर तांड्यावर तीन मुलींनी कोरीयन डान्स ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी आपल्याच अपहरणाचा कट रचला. मात्र अवघ्या 30 मिनिटात तो कट पोलिसांनी उधळून लावला आणि या तीन अल्पवयीन मुलींना ताब्यात घेतले. उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा कट मुलींनी केला आणि त्या थेट पुण्याच्या दिशेने निघाल्या. मात्र धाराशिव पोलिसांच्या दक्षतेने अवघ्या 30 मिनिटात 3 अल्पवयीन मुलींच्या बनावट अपहरणाचा बनाव उघड झाला

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथून मुलींनी स्वतः वडिलांना फोन करून अपहरण केल्याची माहिती दिली. त्यानंतर मोबाईलच्या सिम लोकेशनवरून पोलिसांनी लोकेशन मिळवून मुलींना गाठलं सोलापूर जिल्ह्यातील मोहळ येथे पोलीसांनी या मुलींना ताब्यात घेवून पालकांच्या स्वाधीन केले. कोरियाला जाण्यासाठी मुलींनी स्वतच्या घरातूनच 5 हजार रुपये चोरुन नेल्याची माहिती त्यांनी दिली आहे. उमरग्यातून पुण्यात जाऊन पैसे कमावून कोरियाला जाण्याचा मुलींचा प्लॅन होता मात्र, पोलिसांच्या सतर्कतेने त्यांचा हा डाव उघडकीस आला. 

उमरगा येथील ज्ञानेश्वर विद्यालय तुरोरी येथुन शाळा सुटल्यावर एका पिवळ्या रंगाच्या स्कुलबस मधून काही लोकांनी किडनॅप करून घेवुन गेले आहेत, त्यांच्या गळ्यावर चाकू ठेवून चाकुचा धाक दाखवुन त्यांना नेले आहे, असा फोन पोलिसांना आला होता. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात केली. मात्र एवढ्या ग्रामीण भागातील अल्पवयीन मुली कोरियातील सिंगर आणि डांसर ग्रुपच्या प्रेमात कशा पडल्या, ही आश्चर्य व्यक्त करणारी घटना आहे.