Sidhu Moosewala's Mother gave Birthday to a Boy : दिवंगत पंजाबी गायक आणि रॅपर शुभदीप सिंग सिद्धू ज्याला सिधू मुसेवाला या नावानं ओळखतात. त्याच्या आई-वडिलांनी गेल्या महिन्यात आई-वडील होणार असल्याची गोड बातमी त्याच्या चाहत्यांना दिली. त्याशिवाय त्यांनी सांगितलं होतं की पुढच्या महिन्यात म्हणजेच मार्चमध्ये ते बाळाला जन्म देऊ शकतात. आता सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांचा पहिला फोटो समोर आला आहे. ज्यात त्यांच्या हातात नुकतंच जन्माला आलेला बाळ दिसत आहे.
सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही गोड बातमी शेअर केली आहे. सिद्धू मूसेवालाच्या आई चरणनं वयाच्या 58 व्या वर्षी एका मुलाला जन्म दिला आहे. काही काळापूर्वीच इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. त्याशिवाय त्यांनी त्या मुलाचं नाव देखील सांगितलं आहे.
बलकौर यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर करत कॅप्शन दिलं की "लाखो लोकांच्यां आर्शिवादानं आणि प्रेम पाहता, देवानं आम्हाला शुभचा लहाण भाऊ शुभदिप दिला आहे. देवाच्या क्रुपेनं सगळे निरोगी आहेत आणि सगळ्या शुभचिंतकांनी दिलेल्या प्रेमासाठी आम्ही आभारी आहोत."
बलकौर सिंग आणि त्यांच्या पत्नीविषयी अशा चर्चा सुरु होत्या की त्यांना जुळी मुलं होणार आहेत. त्यावर ना बलकौर यांनी किंवा त्यांची पत्नी चरण यांनी होकार किंवा नकार दिला नाही. त्यांनी फक्त इतकंच सांगितलं होतं की सिद्धूच्या कुटुंबाविषयी असलेल्या अशा कोणत्याही बातमीवर जो पर्यंत आम्ही सांगत नाही तो पर्यंत विश्वास ठेवू नका असं सांगितलं होतं. त्यासगळ्या आता बलकौर यांनी स्वत: पोस्ट शेअर करत ही आई-वडील झाल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे. दरम्यान, बलकौर यांनी काही दिवसांपूर्वी पत्नी चरण कौर आयवीएफच्या मदतीनं 58 व्या वर्षी प्रेग्नंट झाल्याचं सांगत एक पोस्ट शेअर केली होती.
हेही वाचा : ईशा अंबानीच्या होळी पार्टीमध्ये प्रियांका चोप्राच्या नेकपिसनं वेधलं सगळ्यांचे लक्ष!
सिद्धू मुसेवाला विषयी बोलायचं झालं तर 2022 मध्ये त्याच्यावर गोळी झाडत हत्या करण्यात आली होती. सिद्धू हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता.